देवेंद्र पांडे, इंडियन एक्सप्रेस

Rohit Sharma opts to rest for Sydney Test: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनीमध्ये होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार नाही. गौतम गंभीरने रोहित शर्मा सिडनी कसोटीत खेळणार की नाही, या प्रश्नावर दिलेल्या उत्तरानंतर रोहित शर्माच्या अखेरच्या कसोटी खेळण्याबाबत संभ्रम होता. यानतंर सोशल मीडियावर भारताच्या सराव सत्रादरम्यानचे अनेक व्हीडिओ फोटो समोर आल्याने रोहित शर्मा ही कसोटी खेळेल की नाही म्हणणारे बऱ्याच पोस्ट व्हायरल झाल्या होत्या, पण आता रोहित शर्माने स्वत:चं मोठा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे.

IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
IND vs AUS Sam Konstas Statement on Fight With Virat Kohli at Melbourne Test Watch Video
IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?
Tanush Kotian set to replace R Ashwin in India Test squad for last two Australia Tests IND vs AUS
IND vs AUS: टीम इंडियात अश्विनच्या निवृत्तीनंतर मोठा बदल, मुंबई क्रिकेट संघाच्या ‘या’ खेळाडूला दिली संधी
IND vs AUS ICC BCCI and Indian Cricket Team in One Word Australian Cricket Answer Watch Video
VIDEO: ICC पेक्षा BCCI वरचढ? ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दिली भन्नाट उत्तरं, हेड-स्मिथच्या उत्तराने वेधलं लक्ष
Sam Constas statement about Indian bowlers sports news
भारतीय गोलंदाजांसाठी माझ्याकडे योजना तयार -कोन्सटास
Australia make significant changes to squad for two Tests sports news
मॅकस्वीनीला डच्चू, कोन्सटासला संधी; अखेरच्या दोन कसोटींसाठी ऑस्ट्रेलिया संघात महत्त्वपूर्ण बदल

इंडियन एक्सप्रेसच्या ताज्या वृत्तानुसार, रोहितने स्वतःला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितच्या जागी जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. यासह शुबमन गिल पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनचा भाग होईल. तर पाचव्या कसोटीत आकाशदीपच्या जागी प्रसिध कृष्णाला संधी मिळू शकते.

हेही वाचा – Rohit Sharma: रोहित शर्मा सिडनी कसोटीबाहेर होणार? सराव सत्राचा व्हीडिओ, गिल-कोच-बुमराह भेट, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, रोहितने प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना त्याची प्लेईंग इलेव्हनमधील निवड रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे आणि या निर्णयावर या दोघांनी सहमती दर्शवली आहे.

रोहितच्या या निर्णयाचा अर्थ असाही होऊ शकतो की मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटी रोहितची भारतासाठी शेवटची ठरली असावी, कारण यानंतर इंग्लंडच्या दौऱ्यापासून सुरू होणाऱ्या पुढील जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चक्रामध्ये योजनांमध्ये रोहित शर्मा संघाच्या योजनांचा भाग नसू शकतो. सध्याच्या चक्रात भारत WTC फायनलसाठी पात्र ठरण्याची शक्यता फारच कमी आहे.

हेही वाचा – NZ vs SL: ४४ चेंडूत शतक ! श्रीलंकेकडून टी-२०मध्ये १३ वर्षांत पहिल्यांदाच केलं शतक, कुशल परेराचा सर्वात जलद शतकाचा विक्रम

रोहित शर्माच्या जागी आता संघात शुबमन गिलला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार आहे. मेलबर्न कसोटीत शुबमन गिलला वगळण्यात आल्यानंतर पत्रकार परिषदेत सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांना त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आलं होतं. त्यावेळी शुबमनला वगळलेलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. संघाचं संतुलन योग्य असावं यादृष्टीने वॉशिंग्टनला संघात स्थान देण्याचा निर्णय झाला, यामुळे गिलला अंतिम अकरात जागा मिळू शकली नाही असं ते म्हणाले होते. रोहित शर्माने सिडनी कसोटीत विश्रांतीचा निर्णय घेतल्याने गिलचा संघात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा – IND vs AUS: “खेळाडू आणि कोचमधील वाद…”, कोच गंभीरचं सिडनी कसोटीपूर्वी समोर आलेल्या ड्रेसिंग रूममधील वादावर मोठं वक्तव्य

दरम्यान पाठीच्या दुखण्यामुळे वेगवान गोलंदाज आकाश दीप सिडनी कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी हर्षित राणाला संधी मिळणार का प्रसिध कृष्णाला याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होत्या. हर्षित राणा पर्थ कसोटीत खेळला होता. मात्र प्रदीर्घ स्पेल टाकल्यानंतर त्याची दमछाक उडाली होती. त्यामुळे सिडनी कसोटीत प्रसिध कृष्णाला अंतिम अकरात खेळवण्यात येणार आहे. कृष्णाने वर्षभरापूर्वी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. २ कसोटीत त्याने २ विकेट्स पटकावल्या आहेत.

Story img Loader