Yashasvi Jaiswal equals Rohit Sharma record : तीन सामन्यांच्या टी-२०मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४३ धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून २१३ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १९.२ षटकांत १७० धावांवर गारद झाला. या सामन्यात सलामीवीर यशस्वी जैस्वालने शानदार फलंदाजी केली. या सामन्यात यशस्वी जैस्वाल अर्धशतक पूर्ण पूर्ण करेल असे वाटत होते, पण त्याचे अर्धशतक हुकले. पल्लेकेले स्टेडियमवर त्याने २१ चेंडूत ४० धावांची खेळी साकारली. या खेळीत यशस्वीने पाच चौकार आणि दोन षटकार मारले. यशस्वीचे अर्धशतक हुकले असले, तरी विशेष यादीत त्याने रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी केली. जे काम रोहितने १७ वर्षात केले होते, ते यशस्वीने अवघ्या ११ महिन्यांत केले.

खरे तर, टी-२० पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक वेळा ४० किंवा त्याहून अधिक धावा करणारा यशस्वी भारताचा संयुक्त पहिला खेळाडू ठरला आहे. यशस्वी आणि रोहितने प्रत्येकी चार वेळा ही कामगिरी केली आहे. यशस्वीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर, रोहित शर्माने सप्टेंबर २००७ ते जून २०२४ या कालावधीत क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये खेळला आहे. ”हिटमॅन’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या रोहितने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Sanju Samson Tilak Varma Smash World Record in Johannesburg with Fiery Centuries in T20I IND vs SA
IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल

भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक वेळा ४० हून अधिक धावा करणारे फलंदाज –

४ – रोहित शर्मा
४ – यशस्वी जैस्वाल
२ – शिखर धवन
२- केएल राहुल<br>१- वीरेंद्र सेहवाग
१- रॉबिन उथप्पा
१- ऋतुराज गायकवाड</p>

हेही वाचा – ENG vs WI : जो रुटने ब्रायन लाराला मागे टाकत केला मोठा पराक्रम, ‘ही कामगिरी करणारा ठरला जगातील सातवा फलंदाज

श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या भारताच्या यशस्वीने शुबमन गिल (१६ चेंडूत ३४ धावा, सहा चौकार, एक षटकार) याच्या साथीने भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये ७४ धावा जोडल्या. हा भारताचा श्रीलंकेविरुद्धचा टी-२० मधील पॉवरप्लेची सर्वोच्च धावसंख्या आहे. सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गिल दिलशान मदुशंकाचा बळी ठरला. गिल गेल्यानंतर यशस्वीही फार काळ टिकला नाही. सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याला वानिंदू हसरंगाने यष्टिचित केले. यशस्वी आणि गिलच्या शानदार फलंदाजीनंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांनी दमदार फटकेबाजी केली.

हेही वाचा – Sanjay Manjrekar : ‘…हा विचार आपण सोडून देण्याची वेळ आलीय’; संजय मांजरेकरांचे टीम इंडियाच्या कोचबद्दल मोठे वक्तव्य

सूर्याने २६ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांसह ५८ धावा केल्या. पंतने ३३ चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकारासह ४९ धावा केल्या. ज्यामुळे भारतीय संघाला ७ गडी गमावून २१३ धावांचा डोंगर उभारता आला. प्रत्युत्तरात एकवेळ श्रीलंकेची धावसंख्या एका विकेटवर १४० धावा होती. मात्र, यानंतर श्रीलंकेच्या संघाने ३० धावांत पुढील नऊ विकेट गमावल्या. श्रीलंकेकडून पथुम निसांकाने सर्वाधिक ७९ धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून रियान परागने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याने २० व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूत दोन बळी घेतले. अशा प्रकारे टीम इंडियाने मालिकेत १-० ने आघाडी घेतली.