Rohit Sharma flop show continues in Ranji Trophy 2024-25 : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अलीकडच्या काळात कसोटी चेंडूच्या क्रिकेटमध्ये अतिशय खराब फॉर्ममधून जात आहे. आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी आणि ट्रॅकवर येण्यासाठी रोहित शर्माने आपला मोर्चा जवळपास १० वर्षांनी रणजी क्रिकेटकडे वळवला आहे. त्याने अखेरचा रणजी सामना २०१५ मध्ये खेळला होता. मात्र, या स्पर्धेतही मुंबईकडून खेळताना त्याचा फ्लॉप शो कायम आहे. केवळ ३ धावा करून बाद झाला. रोहितने येथेही चाहत्यांची निराशा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माशिवाय जैस्वालही अपयशी ठरला –

जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळल्या जात असलेल्या या सामन्यात रोहित शर्मा पहिल्या डावात १९ चेंडूंचा सामना केल्यानंतर अवघ्या ३ धावा करून बाद झाला. रोहितला उमर नझीरने बाद केले. रोहित शर्मा या डावात ॲडलेड कसोटीत ज्या प्रकारे बाद झाला होता, त्याच प्रकारे बाद झाला. रोहितशिवाय दुसरा सलामीवीर यशस्वी जैस्वाललाही या सामन्याच्या पहिल्या डावात काहीही विशेष फलंदाजी करता आली नाही. पहिल्या डावात ८ चेंडूत ४ धावा करून जैस्वालही स्वस्तात बाद झाला. त्याला औकीब नबीने बाद केले.

जम्मू-काश्मीर गोलंदाजांनी या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना बाद करत आपल्या संघाला चांगली सुरुवात करुन दिली. इंडियासाठी सलामी दिली. हे दोन्ही फलंदाज बाद होताच, बऱ्याच चाहत्यांनी स्टेडियममधून बाहेर पडण्यास सुरुवात केली. जणू ते केवळ रोहित आणि जैस्वालची फलंदाजी पाहण्यासाठीच आले होते, असे वाटत होते.

हेही वाचा – IND vs ENG : ‘मला पूर्ण स्वातंत्र्य दिले…’, अभिषेक शर्माने आपल्या वादळी खेळीचे श्रेय कोणाला दिले? जाणून घ्या

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी चिंता –

१९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. २० फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्माचे आणखी तीन सामने होणार आहेत. जिथे रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा त्याच्या फॉर्मवर असतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma dismissed for just 3 runs off 19 balls against jammu kashmir in the ranji trophy vbm