दिवाळीच्या निमित्ताने संपूर्ण देशभर फटाक्यांची आतषबाजी होत असताना एम. चिन्नास्वामीच्या स्टेडियमवर रोहित शर्माने चौकार-षटकारांची मुक्त उधळण करत द्विशतकाचा ‘डबलबार’ उडवून दिला. बराच काळ धुगधुगत असलेला एखादा ‘रस्सीबॉम्ब’ फुटल्याप्रमाणे रोहित कांगारूंच्या गोलंदाजांवर तुटून पडला. आणि १६ विश्वविक्रमी षटकारांनिशी द्विशतक ठोकत अशी कामगारी करणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या पंक्तित त्याने स्थान मिळवले. त्याच्या या खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा ५७ धावांनी पराभव करून एकदिवसीय मालिका ३-२ अशी जिंकत दिवाळीचा पहिला दिवस सार्थकी लावला. रोहितच्या फलंदाजीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६ बाद ३८३ धावांचा डोंगर उभा केला. हे लक्ष्य पार करताना जेम्स फॉल्कनर (११६), ग्लेन मॅक्सवेल (६०) आणि शेन वॉटसन (४९) यांनी चिवट झुंज दिली, पण त्यांचा डाव ३२६ धावांवर संपुष्टात आला.
रोहित शर्माने आपल्या स्फोटक खेळीत १६ षटकार लगावत ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनचा एका सामन्यातील १५ षटकारांचा विक्रमही मोडीत काढला.
तिन्ही द्विशतके भारतीय फलंदाजांनी झळकावली आहेत. सचिनने द. आफ्रिकेविरुद्ध २०१०मध्ये नाबाद २०० धावा केल्या. सेहवागने २०११मध्ये इंदूर येथे वेस्ट इंडिजविरुद्ध २१९ धावांची खेळी करत हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
डबलबार!
दिवाळीच्या निमित्ताने संपूर्ण देशभर फटाक्यांची आतषबाजी होत असताना एम. चिन्नास्वामीच्या स्टेडियमवर रोहित शर्माने चौकार-षटकारांची मुक्त उधळण करत
First published on: 02-11-2013 at 05:56 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma double century lights up bangalore on diwali