India vs Netherlands ICC Cricket World Cup 2023 Match Updates: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये उत्कृष्ट फलंदाजी सुरूच आहे. नेदरलँड्सविरुद्धही त्याची आक्रमक शैली पुन्हा एकदा पाहिला मिळाली. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने ६१ धावांची जलद खेळी केली आणि संघाला वेगवान सुरुवात करुन देण्यात तो तो यशस्वी ठरला. त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याचबरोबर आपल्या डावात मारलेल्या २ षटकारांच्या मदतीने त्याने इऑन मॉर्गनचा विक्रमही मोडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शर्माने मोडला इऑन मॉर्गनचा विक्रम –

या सामन्यात रोहित शर्माने ५४ चेंडूत २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. तसेच त्याने या खेळीत मारलेल्या दोन षटकारांच्या मदतीने त्याने जागतिक क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम केला. रोहित शर्मा आता एकदिवसीय विश्वचषकात कर्णधार म्हणून एका मोसमात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे. रोहित शर्माने या विश्वचषकात आतापर्यंत एकूण २४ षटकार मारले आहेत, तर मॉर्गनने २०१९ मध्ये एकूण २२ षटकार मारले होते. रोहित आता त्याला मागे टाकून या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

एका विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारे कर्णधार –

२४ – रोहित शर्मा – २०२३
२२ – इऑन मॉर्गन – २०१९
२१ – एबी डिव्हिलियर्स – २०१५
१८ – अॅरॉन फिंच – २०१९
१७ – ब्रेंडन मॅक्क्युलम २०१५

हेही वाचा – IND vs NED: हिटमॅनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, रोहितने एका वर्षात सर्वाधिक षटकार मारत ‘या’ खेळाडूला टाकले मागे

रोहित शर्माने सचिनच्या विक्रमाशी केली बरोबरी –

रोहित शर्माने या विश्वचषकात ५०० धावांचा टप्पा गाठला. दोन विश्वचषकांमध्ये ५०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो भारताचा दुसरा फलंदाज ठरला. रोहित शर्माने हा पराक्रम यापूर्वी २०१९ मध्ये केला होता आणि आता २०२३ मध्ये केला आहे. तसेच सचिन तेंडुलकरने हा विक्रम १९९६ आणि २००३ मध्ये केला होता. रोहित शर्माने या विश्वचषकात खेळलेल्या ९ डावात एकूण ५०३ धावा केल्या आहेत.

रोहित शर्माने कुमार संगकाराला टाकले मागे –

रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेत १३व्यांदा ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने १२ वेळा अशी कामगिरी करणाऱ्या कुमार संगकाराला मागे टाकले. त्याचबरोबर कोहलीने विश्वचषकात १३ वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी खेळणाऱ्या शकिब अल हसनची बरोबरी केली. या बाबतीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने २१ वेळा हा पराक्रम केला आहे.

हेही वाचा – VIDEO: अफगाणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाजने जिंकली भारतीय चाहत्यांची मनं, दिवाळीपूर्वी गरीब लोकांना वाटले पैसे

एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक वेळा ५०हून अधिक धावा करणारे फलंदाज –

२१ – सचिन तेंडुलकर (४४ डाव)
१४ – विराट कोहली (३५ डाव)
१३ – रोहित शर्मा (२६ डाव)
१३ – शकिब अल हसन (३६ डाव)
१२ – कुमार संगकारा (३५ डाव)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma equaled sachin tendulkars record of 500 runs in two odi world cup vbm
Show comments