तिसऱ्या वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 7 गडी राखून विजय मिळवत 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने शतकी भागीदारी रचत भारताच्या विजयाची पायाभरणी रचली. या खेळीदरम्यान रोहित शर्माने आणखी एका विक्रमाची बरोबरी केली आहे. भारतीय संघाकडून सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने धोनीशी बरोबरी साधली आहे.

महेंद्रसिंह धोनीने 285 डावांमध्ये 215 षटकार ठोकले आहेत. तर रोहित शर्माने 193 डावांमध्ये ही कामगिरी साधली आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्माने 62 धावांची खेळी केली. या खेळीत रोहितने 2 षटकार ठोकले.

वन-डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांची यादी पुढीलप्रमाणे –

  • महेंद्रसिंह धोनी – 215
  • रोहित शर्मा – 215
  • सचिन तेंडुलकर – 195
  • सौरव गांगुली – 189
  • युवराज सिंह – 153
  • विरेंद्र सेहवाग – 134
  • सुरेश रैना – 120
  • विराट कोहली – 114
  • अजय जाडेजा – 85
  • मोहम्मद अझरुद्दीन – 77

अवश्य वाचा – धोनीच्या दुखापतीची चिंता नको, तो अजुनही फिट अँड फाईन ! हा घ्या पुरावा

Story img Loader