वृत्तसंस्था, सिडनी

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने निवृत्तीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देताना गेल्या काही काळापासून धावा होत नसल्याने आपण सिडनी कसोटीसाठी संघाबाहेर राहण्याचा स्वत:हून निर्णय घेतला. आपण निवृत्तीचा विचारही केला नसल्याचे स्पष्टीकरण शनिवारी दिले.

Yuzvendra Chahal shares cryptic Instagram story amid divorce rumours with Dhanashree Verma
Yuzvendra Chahal : ‘जगाला माहीत आहे…’, चहल-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान युजवेंद्रची इन्स्टा स्टोरी व्हायरल
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
rishabh pant
कसोटी रंगतदार स्थितीत, बोलँडच्या भेदकतेला पंतचे आक्रमकतेने प्रत्युत्तर; भारताकडे आघाडी
Why is India wearing a Pink striped jersey on Day 3 of IND vs AUS 5th Test
IND vs AUS : सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने गुलाबी रंगाचे पट्टे असलेली जर्सी का घातली? जाणून घ्या कारण
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
IND v AUS Australia wins BGT 2025 after 10 years against India
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनी भारताला नमवत जिंकली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, WTC फायनलमध्ये मारली धडक
India Disqualified From WTC Final After Defeating in Border Gavaskar Trophy Australia vs South Africa
WTC Final: भारत WTC फायनलसाठी ‘नापास’; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही; ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिकेत रंगणार अंतिम सामना

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत तीन सामन्यांत मिळून रोहितला केवळ ३१ धावा करता आल्या. त्यातच त्याच्या नेतृत्वाखाली भारताने तीनपैकी दोन सामने गमावले. भारताने या मालिकेतील एकमेव विजय जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली मिळवला होता. त्यामुळे सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू असलेल्या निर्णायक पाचव्या कसोटीसाठी रोहितने स्वत:हून विश्रांती घेतली. त्यानंतर त्याच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाली होती. रोहितची कसोटी कारकीर्द संपुष्टात आल्याचेही म्हटले गेले. त्यामुळे रोहितने प्रक्षेपणकर्त्या वाहिनीला मुलाखत देताना या सर्व मुद्द्यांवर भाष्य केले.

‘‘मी निवृत्त वगैरे झालेलो नाही. केवळ या सामन्यासाठी मी स्वत:हून संघाबाहेर राहिलो. प्रशिक्षक आणि निवडकर्ते यांच्याशी मी चर्चा केली. मी लयीत नाही. अलीकडच्या काळात माझ्याकडून धावा झालेल्या नाहीत. हा खूप महत्त्वाचा सामना असून यात सर्वाधिक लयीत असलेले खेळाडूच खेळले पाहिजेत असे मी त्यांना सांगितले. त्यांनाही हे पटले. तू अनेक वर्षांपासून देशासाठी खेळत आहेस. त्यामुळे काय चूक आणि काय बरोबर हे तुला ठाऊक आहे. तुझा निर्णय आम्हाला मान्य आहे, असे त्यांनी मला सांगितले,’’ असे रोहित म्हणाला.

हेही वाचा >>>IND vs AUS: जसप्रीत बुमराहवर बूटमध्ये सँडपेपर लपवल्याचा ऑस्ट्रेलियन चाहत्यांचा आरोप; व्हायरल VIDEO मुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण

‘‘आमच्या संघातील बऱ्याच फलंदाजांच्या धावा झालेल्या नाहीत. त्यामुळे लयीत नसलेल्या फार खेळाडूंना संघात स्थान देणे योग्य ठरणार नाही. मी केवळ याच गोष्टीचा विचार करत होतो. त्यामुळे मी स्वत:हून संघाबाहेर राहणे पसंत केले. माझ्यासाठी हा निर्णय खूप अवघड होता. परंतु मी सर्व गोष्टींचा विचार केला आणि समजूतदारपणा दाखवून हा निर्णय घ्यावा असे मला वाटले. मी याहून पुढचा विचार केलेला नाही,’’ असेही रोहितने सांगितले.

‘‘हातात माइक, लॅपटॉप किंवा पेन असणारी व्यक्ती आमचे भवितव्य ठरवू शकत नाही. आम्ही कधी खेळापासून दूर जायचे आणि कधी खेळत राहायचे याचा निर्णय आम्हीच घेऊ. मी एक समजूतदार माणूस आहे. दोन मुलांचा बाप आहे. आयुष्यात मला काय हवे आहे हे ठरवण्यासाठी आवश्यक बुद्धी माझ्याकडे आहे,’’ असे म्हणत रोहितने माध्यमांवर ताशेरे ओढले.

तसेच मेलबर्न येथे झालेल्या चौथ्या कसोटीतील पराभवानंतरच तू निर्णायक सामन्यासाठी संघाबाहेर बसण्याचा निर्णय घेतला होतास का, असे विचारले असता, ‘‘नाही. मी सिडनीमध्ये दाखल झाल्यानंतर हा निर्णय घेतला. मेलबर्न कसोटीनंतर आमच्याकडे केवळ दोन दिवसांचा कालावधी होता. त्यातील एक दिवस हा नववर्षाचा पहिला दिवस होता. त्यामुळे या दिवशी मला प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांना माझा निर्णय सांगायचा नव्हता. मी सिडनी कसोटीच्या एक दिवस आधी माझा निर्णय त्यांना कळवला. संघाचे हित लक्षात घेत संघाबाहेर राहणेच मला अधिक योग्य वाटले,’’ असे उत्तर रोहितने दिले.

मी निवृत्ती वैगरे घेतलेली नाही. इतक्यात खेळापासून दूर जाण्याचा माझा विचारही नाही. मी केवळ या सामन्यासाठी संघाबाहेर बसलो, कारण गेल्या काही काळापासून माझ्या धावा झालेल्या नाहीत. मात्र, पुढेही हेच चित्र राहील असे नाही. क्रिकेटमध्ये दर सेकंदाला, मिनिटाला, प्रत्येक दिवशी गोष्टी बदलत असतात. त्यामुळे दोन महिने किंवा सहा महिन्यांनीही मी धावांसाठी झगडत असेन असे नाही. मला स्वत:च्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. मी आता लयीत नाही. त्यामुळे या निर्णायक सामन्यासाठी आपण संघाबाहेर राहिले पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटले आणि मी हा निर्णय घेतला. रोहित शर्मा.

Story img Loader