वृत्तसंस्था, सिडनी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने निवृत्तीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देताना गेल्या काही काळापासून धावा होत नसल्याने आपण सिडनी कसोटीसाठी संघाबाहेर राहण्याचा स्वत:हून निर्णय घेतला. आपण निवृत्तीचा विचारही केला नसल्याचे स्पष्टीकरण शनिवारी दिले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत तीन सामन्यांत मिळून रोहितला केवळ ३१ धावा करता आल्या. त्यातच त्याच्या नेतृत्वाखाली भारताने तीनपैकी दोन सामने गमावले. भारताने या मालिकेतील एकमेव विजय जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली मिळवला होता. त्यामुळे सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू असलेल्या निर्णायक पाचव्या कसोटीसाठी रोहितने स्वत:हून विश्रांती घेतली. त्यानंतर त्याच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाली होती. रोहितची कसोटी कारकीर्द संपुष्टात आल्याचेही म्हटले गेले. त्यामुळे रोहितने प्रक्षेपणकर्त्या वाहिनीला मुलाखत देताना या सर्व मुद्द्यांवर भाष्य केले.
‘‘मी निवृत्त वगैरे झालेलो नाही. केवळ या सामन्यासाठी मी स्वत:हून संघाबाहेर राहिलो. प्रशिक्षक आणि निवडकर्ते यांच्याशी मी चर्चा केली. मी लयीत नाही. अलीकडच्या काळात माझ्याकडून धावा झालेल्या नाहीत. हा खूप महत्त्वाचा सामना असून यात सर्वाधिक लयीत असलेले खेळाडूच खेळले पाहिजेत असे मी त्यांना सांगितले. त्यांनाही हे पटले. तू अनेक वर्षांपासून देशासाठी खेळत आहेस. त्यामुळे काय चूक आणि काय बरोबर हे तुला ठाऊक आहे. तुझा निर्णय आम्हाला मान्य आहे, असे त्यांनी मला सांगितले,’’ असे रोहित म्हणाला.
‘‘आमच्या संघातील बऱ्याच फलंदाजांच्या धावा झालेल्या नाहीत. त्यामुळे लयीत नसलेल्या फार खेळाडूंना संघात स्थान देणे योग्य ठरणार नाही. मी केवळ याच गोष्टीचा विचार करत होतो. त्यामुळे मी स्वत:हून संघाबाहेर राहणे पसंत केले. माझ्यासाठी हा निर्णय खूप अवघड होता. परंतु मी सर्व गोष्टींचा विचार केला आणि समजूतदारपणा दाखवून हा निर्णय घ्यावा असे मला वाटले. मी याहून पुढचा विचार केलेला नाही,’’ असेही रोहितने सांगितले.
‘‘हातात माइक, लॅपटॉप किंवा पेन असणारी व्यक्ती आमचे भवितव्य ठरवू शकत नाही. आम्ही कधी खेळापासून दूर जायचे आणि कधी खेळत राहायचे याचा निर्णय आम्हीच घेऊ. मी एक समजूतदार माणूस आहे. दोन मुलांचा बाप आहे. आयुष्यात मला काय हवे आहे हे ठरवण्यासाठी आवश्यक बुद्धी माझ्याकडे आहे,’’ असे म्हणत रोहितने माध्यमांवर ताशेरे ओढले.
तसेच मेलबर्न येथे झालेल्या चौथ्या कसोटीतील पराभवानंतरच तू निर्णायक सामन्यासाठी संघाबाहेर बसण्याचा निर्णय घेतला होतास का, असे विचारले असता, ‘‘नाही. मी सिडनीमध्ये दाखल झाल्यानंतर हा निर्णय घेतला. मेलबर्न कसोटीनंतर आमच्याकडे केवळ दोन दिवसांचा कालावधी होता. त्यातील एक दिवस हा नववर्षाचा पहिला दिवस होता. त्यामुळे या दिवशी मला प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांना माझा निर्णय सांगायचा नव्हता. मी सिडनी कसोटीच्या एक दिवस आधी माझा निर्णय त्यांना कळवला. संघाचे हित लक्षात घेत संघाबाहेर राहणेच मला अधिक योग्य वाटले,’’ असे उत्तर रोहितने दिले.
मी निवृत्ती वैगरे घेतलेली नाही. इतक्यात खेळापासून दूर जाण्याचा माझा विचारही नाही. मी केवळ या सामन्यासाठी संघाबाहेर बसलो, कारण गेल्या काही काळापासून माझ्या धावा झालेल्या नाहीत. मात्र, पुढेही हेच चित्र राहील असे नाही. क्रिकेटमध्ये दर सेकंदाला, मिनिटाला, प्रत्येक दिवशी गोष्टी बदलत असतात. त्यामुळे दोन महिने किंवा सहा महिन्यांनीही मी धावांसाठी झगडत असेन असे नाही. मला स्वत:च्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. मी आता लयीत नाही. त्यामुळे या निर्णायक सामन्यासाठी आपण संघाबाहेर राहिले पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटले आणि मी हा निर्णय घेतला. – रोहित शर्मा.