Rohit Sharma Half Century: दुबईमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा कर्णधार रोहित रोहित शर्माने ७६ धावांची खेळी करत आयसीसी स्पर्धांतील ९ अंतिम सामन्यात पहिले अर्धशतक झळकावले आहे. या सामन्यात रोहितने केवळ ४१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत न्यूझीलंडच्या २५३ धावांचा पाठलाग करताना भारताला दमदार सुरुवात करून दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१८ वर्षांच्या कारकिर्दीत आणि क्रिकेट विविध स्वरूपांमध्ये त्याने आजच्या सामन्यापूर्वी आयसीसी स्पर्धेचे ८ अंतिम सामने खेळले होते. परंतु, त्याला या आठही सामन्यांमध्ये एकही अर्धशतक करता आले नव्हते. पण, आजच्या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत रोहितने नवव्या अंतिम सामन्यात पहिले अर्धशतक केले. दरम्यान, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ३१ चेंडूत ४७ धावा केल्या होत्या. परंतु त्यावेळी त्याचे अर्धशतक ३ धावांनी हुकले होते.

रोहितने काही दिवसांपूर्वीच एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११,००० धावांचा टप्पा ओलांडत गेल्या महिन्यात इंग्लंडविरुद्ध ३२ वे एकदिवसीय शतक झळकावले होते. या स्पर्धेत मागील चार सामन्यांमध्ये रोहितची कामगिरी निराशाजनक राहिली होती. रोहितने गट फेरीत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत ४१, २०, १५ आणि २८ धावा केल्या आहेत.

रोहित आयसीसी स्पर्धेचा पहिला अंतिम सामना २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. मुंबईकर रोहितने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात नाबाद ३० धावा काढल्या होत्या.

रोहित शर्माची आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील कामगिरी

नाबाद ३० विरुद्ध पाकिस्तान – टी२० विश्वचषक २००७
९ विरुद्ध इंग्लंड – चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३
२९ विरुद्ध श्रीलंका – टी२० विश्वचषक २०१४
० विरुद्ध पाकिस्तान – चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७
३४ आणि ३० विरुद्ध न्यूझीलंड – जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१
१५ आणि ४३ विरुद्ध ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३
४७ विरुद्ध ऑस्ट्रेलिया – विश्वचषक २०२३
९ विरुद्ध दक्षिण आफ्रिका – टी२० विश्वचषक २०२४
७६ विरुद्ध न्यूझीलंड – चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७

सर्वाधिक षटकार

रोहित शर्माने आजच्या अंतिम सामन्यात षटकार मारून आपले खाते उघडले. यानंतर, रोहित एका बाजूने सतत वेगाने धावा काढताना दिसला. परंतु रोहितने त्याच्या डावातील तिसरा षटकार मारताच, तो आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला. या बाबतीत, रोहित शर्माने क्रिस गेलचा विक्रम मोडला ज्याच्या नावावर एकूण ३२ षटकार आहेत. तर रोहितने आतापर्यंत ३३ षटकार मारले आहेत.