Rohit Sharma Shared First Photo with Son Ahaan: कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे जेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचे एकेक खेळाडू मायदेशी परतले. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा सर्वप्रथम त्याच्या संपूर्ण कुटुंबासह मायदेशी परतला. यानंतर रोहित शर्मा सध्या त्याच्या मुंबईच्या घरी त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे. दरम्यान रोहितने त्याच्या लेकाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर त्याच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांना गेल्यावर्षी दुसरा मुलगा झाला. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी रोहित शर्माच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. ज्याचे नाव अहान ठेवण्यात आले. रोहित आणि रितिकाला पहिली मुलगी आहे जिचं नाव समायरा आहे. २०१८ मध्ये समायराचा जन्म झाला होता. लेकाच्या जन्मानंतर रितिकाने इन्स्टाग्रामला एक फोटो शेअर करत त्याचे नाव काय ठेवण्यात आले हे चाहत्यांबरोबर शेअर केले.

रोहित शर्मा त्याच्या लेकाच्या जन्मामुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ च्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला होता. लेकाच्या जन्मानंतर दुसऱ्या कसोटीसाठी रोहित शर्मा संघात सामील झाला. रोहित शर्माने स्वत: फोटो शेअर करत लेकाच्या जन्माची माहिती दिली होती. यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर रोहित शर्माने पहिल्यांदा लेकाबरोबर फोटो शेअर करत चाहत्यांना गिफ्ट दिलं आहे.

रोहित शर्माने त्याच्या घराच्या गॅलरीमधील लेक अहान आणि मुलगी समायरा हिच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. रोहित शर्माने अहानला उचलून घेतलं आहे, तर समायरासमोर बॉलने खेळताना दिसत आहे. रोहित शर्माच्या या फोटोवर एका तासात १ मिलियन लाईक आले आहेत, तर १२ हजारपेक्षा जास्त कमेंट आहेत. रोहित शर्माच्या या फोटोवर चाहत्यांनी हार्ट इमोजीच्या अनेक कमेंट्स केल्या आहेत. तर मुंबई इंडियन्सने ‘डॅडी ड्युटीज’ अशी कमेंट केली आहे.

याशिवाय हल्ली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताच्या सामन्यादरम्यान रितिका सजदेह लेकाबरोबर स्टॅन्डमध्ये दिसली होती. ऑस्ट्रेलियाविरूद्ध सेमीफायनल सामन्यात रितिका स्टॅन्डसमध्ये लेक अहानला घेऊन सामना पाहताना दिसली होती. याशिवाय विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मादेखील लहान अहानबरोबर खेळतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. याशिवाय अहानचा फोटोदेखील व्हायरल झाला होता.

Story img Loader