IND vs AUS Gaba Test: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना १४ डिंसेबरपासून गाबाच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाच्या खेम्यातून एक बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा यशस्वी जैस्वालवर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. यशस्वी जैस्वालला त्याच्या चुकीमुळे टीम हॉटेलमध्येच सोडण्यात आले. वृत्तानुसार, यशस्वी जैस्वाल टीम बसमध्ये चढण्यासाठी वेळेवर पोहोचला नाही आणि त्यामुळे खेळाडूला तिथेच सोडण्यात आले. यशस्वी बसपाशी पोहोचलो तेव्हा टीम बस निघून गेली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यशस्वी जैस्वाल उशिरा पोहोचल्याने रोहित शर्मा चांगलाच संतापला होता.भारतीय संघ बुधवारी सकाळी अॅडलेडहून ब्रिस्बेनसाठी रवाना होणार होता. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे दोन खेळाडू त्यांच्या कुटुंबासह चार्ट्ड फ्लाईटने ब्रिस्बेनला जाणार होते. याशिवाय भारतीय संघ, सपोर्ट स्टाफ आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर हे सकाळी ८.३० च्या आधी लॉबीमध्ये जमले होते. पण यशस्वी जैस्वाल मात्र तिथे उपस्थित नव्हता.

हेही वाचा – IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?

यशस्वी हा इतरवेळेस कायम वेळेत पोहचतो, पण यावेळेस मात्र तो संपूर्ण संघासह लॉबी एरियामध्ये वेळेत पोहोचला नाही. यशस्वी जैस्वाल उशिरा का पोहोचला याचं कारण तरी अद्याप समोर आलेलं नाही. पण कर्णधाराने मात्र त्याच्या शिस्तभंगाची कारवाई केली आहे.

रोहित काही वेळाने टीम बसमधून बारे आला आणि त्याने संघाच्या मॅनेजरला यशस्वी जैस्वाल कुठे आहे, हे पाहण्यास सांगितले. यानंतर मॅनेजर आणि संघाचे सिक्युरिटी ऑफिसरही बसबाहेर गेले आणि मोठ्या चर्चेनंतर अखेरीस यशस्वी जैस्वालशिवाय टीम बस सोडण्यात आली, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा – Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज

टीम बस गेल्यानंतर २० मिनिटांनी यशस्वी जैस्वाल लॉबीमध्ये आला. यशस्वीसाठी संघाने कारची व्यवस्था केली होती. यानंतर यशस्वीबरोबर संघाचे वरिष्ठ सिक्युरिटी ऑफिसर कारने विमानतळावर पोहोचले. ऑस्ट्रेलियातून आलेल्या वृत्तानुसार, टीम इंडियाची ब्रिस्बेनला जाणारी फ्लाइट सकाळी १०.०५ वाजता होती. सकाळी ८.२० वाजता संघाचे खेळाडू संघ बसमध्ये चढू लागले. ८.३० पर्यंत टीम बस विमानतळासाठी निघणार होती मात्र जैस्वाल वेळेवर पोहोचला नाही.

गाबा कसोटीत आता सर्वांच्या नजरा रोहित शर्मा विराट कोहलीसारख्या भारताच्या वरिष्ठ खेळाडूंवर असणार आहे. भारताला मालिकेत कायम ठेवण्यासाठी रोहित-विराटकडून चांगल्या कामगिरीची सर्वांना अपेक्षा आहे. विराट कोहलीने पहिल्या कसोटीत शतक झळकावले होते, पण इतर तिन्ही डावांमध्ये तो फेल ठरला. यानंतर रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला पण तिथे तो चांगली खेळी करू शकला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma furious on yashasvi jaiswal team bus leaves without him due to indiscipline of india opener ind vs aus bdg