Rohit Sharma gave important advice to Yashasvi Jaiswal ahead of the first Test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात १२ जुलै, बुधवारपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात स्टार युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल टीम इंडियाकडून खेळणे जवळपास निश्चित झाले आहे. जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर कॅप्टन रोहित शर्माने स्वतः जैस्वालच्या पदार्पणाबद्दल माहिती दिली आहे. त्याचवेळी पदार्पणापूर्वी रोहित शर्माने जैस्वालला खास सल्ला दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माने जैस्वालला कसोटी पदार्पणात कसे खेळायचे हे सांगितले. यशस्वी जैस्वालने रोहित शर्मासोबत नेटमध्ये सराव केला. दरम्यान, कर्णधाराने त्याला नेट्सपासून दूर नेले आणि कोणतीही पर्वा न करता खेळायचे असल्याचे सांगितले. हा एक मोठा टप्पा आणि कसोटी क्रिकेट आहे, असा विचार त्यांनी करू नये.मोटीवेशन सेशनमध्ये रोहित शर्मा म्हणाला, “तुम्हाला अनेक लोक भेटतील ज्यात मी स्वत:, कर्णधार, वरिष्ठ खेळाडू आणि प्रशिक्षक वेगवेगळे सल्ले देतील आणि प्रत्येकाचे धोरण योग्य आहे पण तुम्हाला विचलित होण्याची गरज नाही.”

रोहित पुढे म्हणाला, “एक कर्णधार आणि एक खेळाडू म्हणून मला माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगायचे आहे की, जेव्हा तुम्ही फलंदाजीला जाल तेव्हा विचार करा की तुम्ही तेथील राजा आहात. तुम्ही आतापर्यंत सर्व प्रकारच्या क्रिकेटवर वर्चस्व गाजवले आहे आणि त्यामुळेच तुम्ही इथपर्यंत पोहोचलात.” रोहित शर्माने पुढे सल्ला दिला की, या क्षणाचा आनंद घ्या कारण तुम्हाला आयुष्यात दररोज टेस्ट कॅप मिळत नाही. रोहित म्हणाला, “तुझ्यात प्रतिभा, क्षमता आहे आणि तू चांगली कामगिरी करशील. या क्षणाचा आनंद घ्या. कारण कसोटी कॅप दररोज मिळत नाही.”

हेही वाचा – Asia Cup 2023: आशिया चषकासाठी भारत पाकिस्तानला जाणार नाहीत, खुद्द जय शाहांनीच सांगितले; ‘या’ दिवशी होणार वेळापत्रक जाहीर

गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल –

नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये कर्णधार रोहित शर्मासह शुबमन गिल भारतीय संघासाठी सलामीची जबाबदारी सांभाळताना दिसला. पण, वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. कर्णधार रोहित शर्माने स्वतः सांगितले की, “शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. कारण त्याला तिथे खेळायचे आहे.”

भारत आणि वेस्ट इंडीज दोन्ही संघातील खेळाडू:

वेस्ट इंडिज संघ: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानाझ, तागेतारीन चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, रेमन रीफर, केमार वॉर्मल रोच

हेही वाचा – World Cup 2023: “… म्हणूनच २०२३चा वन डे विश्वचषक भारत जिंकू शकणार नाही”, माजी खेळाडू युवराज सिंगचे धक्कादायक विधान

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, श्रीकर भारत, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma gave important advice to yashasvi jaiswal ahead of the first test against west indies vbm