Rohit Sharmaon Shubman Gill’s fitness and Team India’s preparations: आयसीसी विश्वचषक २०२३ स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील आपला पहिला सामना रविवारी (८ ऑक्टोबरला) चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर खेळणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसरा दुपार २ वाजता सुरु होईल आणि या सामन्यात टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलिया संघाचे आव्हान असणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने टीम इंडियाची तयारी आणि शुबमन गिलच्या फिटनेसवर प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, “आमच्या संघातील खेळाडूंचा मूड उत्कृष्ट आहे. आमची तयारी उत्तम आहे, आमचे खेळाडू आत्मविश्वासाने भरलेले आहेत.” याशिवाय रोहित शर्माने शुबमन गिलच्या फिटनेसवर आपली प्रतिक्रिया दिली. रोहित शर्मा म्हणाला की, “शुबमन गिल १०० टक्के फिट नाही. खरे तर शुभमन गिल आजारी आहे. आमची नजर शुबमन गिलच्या फिटनेसवर आहे.”

रोहित शर्मा मीडियाशी बोलताना म्हणाला, “आम्ही शुबमन गिलला सावरण्याची पूर्ण संधी देऊ. तो अजून बाहेर झालेला नाही. तो आजारी आहे आणि मी त्याची स्थिती समजू शकतो. तो ठीक व्हावा अशी माझी इच्छा आहे. मला हे कर्णधार म्हणून नाही, तर माणूस म्हणून वाचत आहे. तो तरुण असून त्याचे शरीर तंदुरुस्त आहे. तो लवकरच बरा होईल.”

हेही वाचा – Asian Games: भारतीय पुरुष क्रिकेट संघाने पटकावले सुवर्णपदक, अफगाणिस्तानला खराब रॅकिंगचा बसला फटका

विश्वचषकात नेहमीच दबाव असतो-

रोहितला दबावाबाबत विचारले असता तो म्हणाला की, हा विश्वचषक आहे आणि नेहमीच दबाव असतो. तो म्हणाला, “आम्ही फलंदाजांची भूमिका स्पष्ट करतो. त्यानंतर आम्ही त्यांना खेळण्याचे स्वातंत्र्य देतो. मी १६ वर्षे झाली खेळत आहे. तुम्ही दडपण कसे हाताळता हे तुमच्यावर अवलंबून आहे. हा विश्वचषक आहे आणि यामध्ये नेहमीच दबाव असतो.”

हेही वाचा – PAK vs NED: नेदरलँडविरुद्धच्या सामन्यादरम्यान मोहम्मद रिझवानने केले नमाज पठन, VIDEO होतोय व्हायरल

इशान किशन घेणार शुबमन गिलची जागा –

टीम मॅनेजमेंटला शुबमन गिलबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही. अशा स्थितीत त्याच्या जागी डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन खेळणार हे निश्चित मानले जात आहे. सराव सत्रात त्याने वेगवान गोलंदाजांचा सामना केला आहे. किशनने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजविरुद्ध नेटमध्ये फलंदाजी केली. मात्र, या काळात तो आरामात दिसला नाही. या काळात राहुल द्रविडने किशनवर लक्ष ठेवले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma gave information on shubman gills fitness and team indias preparations for ind vs aus match vbm
Show comments