Rohit Sharma Stump Mic Video IND vs BAN 1st Test: रोहित शर्मा आणि स्टंप माईक यांचं एक वेगळंच कनेक्शन आहे. रोहित शर्मा आणि संघ मैदानात यष्टीरक्षण करत असताना अनेकदा रोहित शर्मा आपल्या स्टाईलमध्ये खेळाडूंशी बोलत असतो. सध्या सुरू असलेल्या बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटीतील रोहित शर्माचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो यष्टीरक्षण करत असलेल्या खेळाडूंना ओरडत आहे. पण नेमकं काय घडलं, पाहूया.

रोहित शर्मा आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये मैदानावर संघातील खेळाडूंना सतर्क ठेवतो. आपल्या विनोदबुद्धीसाठी ओळखला जाणारा कर्णधार जेव्हाही मैदानावर असतो तेव्हा संघातील इतर खेळाडूंना सामन्यात लक्ष ठेवण्यासाठी ओरडत असतो. या वर्षाच्या सुरुवातीला रोहितने आपल्या प्रसिद्ध ‘गार्डनमध्ये फिरणारी मुलं…’ या विधानाने सर्वांनाच खळखळून हसवले होते. या वर्षी मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यानचा त्याचा हा व्हीडिओ आणि हे विधान व्हायरल झालं होतं.

India 2025 cricket calendar England Tour Champions Trophy Women's World Cup Australia Tour
India 2025 Cricket Calendar: इंग्लंड दौरा, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्डकप…, भारताच्या क्रिकेट सामन्यांचं २०२५ मध्ये कसं असणार वेळापत्रक?
IND vs AUS 5th Test Predicted Playing 11 Full Squad Players List Match Timing Live Telecast
IND vs AUS: रोहित शर्माच्या विश्रांतीच्या निर्णयानंतर प्लेइंग…
Rohit Sharma Decide to rest for Sydney Test Jasprit Bumrah to lead India in IND vs AUS BGT final Test
IND vs AUS: रोहित शर्मा सिडनी कसोटीत विश्रांती घेणार; बुमराहकडे नेतृत्वाची धुरा
Rohit Sharma Might out of Sydney Test India Training Session Gives Hints Watch Video IND vs AUS
Rohit Sharma: रोहित शर्मा सिडनी कसोटीबाहेर होणार? सराव सत्राचा व्हीडिओ, गिल-कोच-बुमराह भेट, सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Image Of Manu Bhaker
Khel Ratna Award 2024 : मनू भाकेर, डी गुकेशसह चार खेळाडूंना खेलरत्न, १७ जानेवारीला होणार पुरस्काराचे वितरण
Kusal Parera T20I Century for Sri Lanka After 13 Years and Broke Tillakaratne Dilshan Record of Fastest Century NZ vs SL
NZ vs SL: ४४ चेंडूत शतक ! श्रीलंकेकडून टी-२०मध्ये १३ वर्षांत पहिल्यांदाच केलं शतक, कुशल परेराचा सर्वात जलद शतकाचा विक्रम
IND vs AUS Australia Playing XI For Sydney test All Rounder Beau Webster To Debut Know About Him
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाकडून ३१ वर्षीय खेळाडू सिडनी कसोटीत करणार पदार्पण, मार्शला दाखवला बाहेरचा रस्ता; कोण आहे हा नवा अष्टपैलू?
Gautam Gambhir Statement on Leaks on India Dressing Room Said Just Reports Not Truth Ahead of IND vs AUS
IND vs AUS: “खेळाडू आणि कोचमधील वाद…”, कोच गंभीरचं सिडनी कसोटीपूर्वी समोर आलेल्या ड्रेसिंग रूममधील वादावर मोठं वक्तव्य
Akash Deep Ruled out of Sydney Test with back issue confirms coach Gambhir Ahead of IND vs AUS
IND vs AUS: सिडनी कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू झाला संघाबाहेर; गौतम गंभीरने दिली माहिती

हेही वाचा – IND vs BAN : विराट कोहलीला रिव्ह्यू टाळणं पडलं महागात; रोहित व अंपायरची प्रतिक्रिया होतेय व्हायरल

या वर्षाच्या सुरूवातीला इंग्लंडविरूद्ध झालेल्या विशाखापट्टणममधील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान या अनुभवी फलंदाजाने आपल्या क्षेत्ररक्षकांना त्यांच्या हलगर्जीपणाबद्दल फटकारले होते आणि त्याच्याच शैलीत त्यांना सावध राहण्याचा इशारा दिला. रोहित म्हणाला होता, जर कोणी गार्डनमध्ये फिरताना दिसलं ना तर बघा फक्त… भारताने इंग्लंडविरूद्धची पाच सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर, रोहितने संघातील नव्या युवा खेळाडूंबरोबर एक फोटो देखील पोस्ट केला होता आणि त्या फोटोला कॅप्शन दिले होते: “गार्डनमध्ये फिरणारी मुलं…”

हेही वाचा – Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह चारशे पार; कपिल देव, शमी, झहीर यांच्या मांदियाळीत पटकावले स्थान

भारत वि बांगलादेश यांच्यातील चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात क्षेत्ररक्षणासाठी मैदानात होता. तेव्हा रोहित शर्माने पुन्हा एकदा आपल्या खेळाडूंना त्यांच्या हलगर्जीपणाबद्दल फटकारले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हिटमॅन क्षेत्ररक्षणामध्ये बदलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, पण तो ज्या क्षेत्ररक्षकाकडे पाहत होता त्याचं कदाचित लक्ष नव्हतं, हे पाहताच रोहित भडकला आणि ओरडताना ओए, सगळेजण झोपले आहेत… मात्र, कॅप्टन कोणावर ओरडत होता हे स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा – IND vs BAN: “तो बांगलादेशचा संघ आहे, त्यामुळे…”, सेहवागचा ‘तो’ सल्ला अश्विन-जडेजाने मानला अन् बांगलादेशी गोलदाजांची केली धुलाई

भारतीय गोलंदाजांची भेदक गोलंदाजी

भारतीय गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करताना जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात ५० धावांत चार विकेट घेतले, तर त्याचे सहकारी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले. डावखुरा फिरकी गोलंदाज जडेजानेही दोन विकेट घेतले. अशारितीने भारताने बांगलादेशला १४९ धावांवर सर्वबाद केले. दुसऱ्या डावातही भारताची टॉप ऑर्डर अपयशी ठरली. रोहित (५) आणि विराट कोहली (१७) यांना मोठी खेळी करता आली नाही, तर पहिल्या डावात ५६ धावा करणारा यशस्वी जैस्वाल दुसऱ्या डावात अवघ्या १० धावांवर बाद झाला. सध्या शुबमन गिल आणि ऋषभ पंतची जोडी तिसऱ्या दिवशी भारताचा डाव पुढे नेत आहे. शुबमन गिलने पहिल्या सत्रातच आपले अर्धशतक पूर्ण केले.

Story img Loader