भारताचा आघाडीचा फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा बालपणीची मत्रीण रितिका साजदे हिच्याशी साखरपुडा झाला. रोहितने बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये रितिकाला लग्नाची मागणी घातली. ‘‘जीवलग मैत्रीण ते पत्नी यापेक्षा चांगली बाब काहीच असू शकत नाही’’, असे रोहितने ट्विट केले आणि सोबत स्वत:चे व रितिकाचे छायाचित्रही समाजमाध्यमावर टाकले. रितिका रोहितची व्यवस्थापक म्हणून काम करत आहे.

Story img Loader