काही दिवसांपूर्वीच द्विशतक झळकावलेल्या रोहित शर्माची १५ सदस्यीय भारतीय कसोटी संघात वर्णी लागली आणि या निवडीने तो नक्कीच भारावून गेला असेल. पण या त्याच्या आनंदावर इडन गार्डन्सवरील एका प्रकारामुळे थोडेसे विरजण पडले असेल. कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार धोनीच्या पाठोपाठ रोहित खेळपट्टी पाहण्यासाठी जात होता. त्यावेळी त्याला इडन गार्डन्सचे क्युरेटर प्रबीर मुखर्जी यांनी रोखले आणि नियमांनुसार तुला खेळपट्टीची पाहणी करता येणार नाही, अशी तंबी दिली. या तंबीनंतर हिरमूसलेला रोहित माघारी फिरला.
याबााबत मुखर्जी म्हणाले की, परंपरा आणि नियम मी कधीही मोडत नाही. आयसीसीच्या नियमांचे मी पालन केले आहे, माझा कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता.

Story img Loader