Rohit Sharma angry in press conference Video Viral: बीसीसीआयने वर्ल्ड कपसाठी १५ सदस्यीय टीम इंडियाची निवड केली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा केली. या दोघांना संघ निवडीबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. यादरम्यान एका पत्रकाराने असा एक प्रश्न विचारला, जो ऐकून रोहित शर्मा चिडला. विश्वचषकादरम्यान हा प्रश्न पुन्हा विचारू नये, अशा स्पष्ट शब्दांत त्यानी सूचना दिल्या.
हा प्रश्न ऐकताच चिडला रोहित शर्मा –
पत्रकार परिषदेदरम्यान रोहित शर्माला ड्रेसिंग रूममधील वातावरणाबद्दल विचारण्यात आले. ड्रेसिंग रूमबाबत समोर येत असलेल्या बातम्यांवर रोहित काय म्हणेल, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. हे ऐकून भारतीय कर्णधार संतापला. अशा प्रश्नाचे उत्तर पुन्हा देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मी आता उत्तर देणार नाही – रोहित शर्मा
रोहित शर्मा म्हणाला, “मी याआधीही सांगितले आहे की याचा संघातील खेळाडूंवर परिणाम होत नाही. सर्व खेळाडूंनी हे सर्व पाहिले आहे. भारतात विश्वचषकादरम्यान आम्ही पत्रकार परिषद घेतो, तेव्हा वातावरण हे आहे की ते असे विचारू नका. कारण मी आता त्याचे उत्तर देणार नाही. याला काही अर्थ नाही. आमचे लक्ष सध्या इतरत्र आहे आणि आम्ही एक संघ म्हणून त्यावर लक्ष केंद्रित करू इच्छितो.”
संघ निवडीवर रोहितचे उत्तर –
भारतीय संघ निवडीबद्दल कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “हे आमचे सर्वोत्तम होते. आम्ही योग्य खेळाडू निवडण्याचा प्रयत्न केला आहे. काही खेळाडूंना संधी मिळाली नाही आणि असे होते. ते निराश असतील. मीही यातून गेलो आहे. तुमचा आत्मविश्वास कायम ठेवावा लागतो. यानंतरच तुम्ही गोष्टी बदलू शकता.” २०११ मध्ये भारतात झालेल्या विश्वचषकात रोहित शर्माची निवड झाली नव्हती, पण यावेळी तो संघाचा कर्णधार आहे.
विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.