Rohit Sharma Press Conference Ahead Of WTC Final 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने मंगळवारी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. खेळाचा अर्थ चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी जोडला गेला आहे आणि कर्णधारपद सोडण्याआधी एक दोन मोठे किताब जिंकण्याचं ध्येय आहे. मागील दहा वर्षांच्या कालावधीत भारताने एकही आयसीसी टूर्नामेंट जिंकली नाही. आज बुधवारी लंडनच्या ओव्हल मैदानात ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा सामना सुरु होणार आहे. विराट कोहलीने २०२२ च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या मालिकेत भारताचं नेतृत्व केलं होतं. परंतु, त्यावेळी ही मालिका जिंकण्यात भारताला अपयश आलं होतं. त्यामुळे विराट कोहलीने कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर रोहित शर्माकेड टीम इंडियाच्या सर्व फॉर्मेटच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत रोहित शर्माला विचारण्यात आलं की, कर्णधार म्हणून भारतासाठी काय देऊन जाणार आहेस, या प्रश्नाचं उत्तर देताना रोहित म्हणाला, मी असो किंवा अन्य कुणी, गेल्या काही वर्षांत ज्यांनी भारताचं नेतृत्व केलं, त्यांनीही भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आणि जास्तीत जास्त सामने जिंकून चॅम्पियन बनण्याकडे लक्ष केंद्रित केलं. माझ्या बाबतीतही असंच काहिसं आहे. मला सामना जिंकवून द्यायचा आहे. मला चॅम्पियनशिप जिंकायची आहे. तुम्ही यासाठीच खेळता.

नक्की वाचा – Asia Cup 2023 : श्रीलंकेसह ‘या’ तीन देशांनी ‘हायब्रिड मॉडेल’ला केली मनाई! दबाव वाढल्याने पाकिस्तानकडे असणार ‘हे’ दोन पर्याय

रोहित पुढे म्हणाला, काही किताब जिंकणं, महत्वाच्या मालिका जिंकणं खूप चांगली गोष्ट ठरेल. परंतु, याबाबतीत खूप जास्त विचार करून आपण स्वत:वर खूप जास्त दबाव आणू शकत नाही. एक कर्णधार म्हणून मी जसं म्हटलं, प्रत्येक कर्णधाराला चॅम्पियनशिप जिंकायची असते. मी पण अशाच पद्धतीने काम करतो. मलाही चॅम्पियनशिप जिंकायची आहे आणि खेळायचा अर्थही याचाशी जोडलेला आहे.

Story img Loader