Rohit Sharma Retirement hints After Gabba Dismissal: भारत ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी गाबामध्ये खेळवली जात असून पुन्हा एकदा या कसोटीत भारताची टॉप फलंदाजी फळी फेल ठरली आहे. कर्णधार रोहित शर्माकडून या सामन्यात चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण पुन्हा एकदा भारतीय कर्णधार रोहित शर्मा फ्लॉप ठरला. मधल्या फळीत फलंदाजी करणारा रोहित शर्मा पुन्हा आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यात अपयशी ठरला आणि स्वस्तात बाद झाला. रोहितच्या विकेटनंतर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यावरून त्याच्या कसोटी निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे.

रोहित शर्मा गाबा कसोटीनंतर कसोटीतून निवृत्ती घेणार?

गाबा कसोटीत भारताच्या पहिल्या डावात रोहित शर्माने पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा केली. त्याने २७ चेंडूत एका चौकारासह केवळ १० धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या चेंडूवर तो यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीकडून झेलबाद झाला. यानंतर, पॅव्हेलियनकडे जात असताना, त्याने आपले हातमोजे काढून टाकत ते त्याने डगआउटमध्ये फेकले. त्याचे दोन्ही हातमोजे डगआउटमध्ये जाहिरात फलकाच्या मागे पडलेले दिसत आहेत. त्यामुळे रोहित आता कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेऊ शकतो, असा अंदाज या फोटोवरून चाहत्यांनी बांधला आहे. चाहत्यांचं असं म्हणणं आहे की रोहितने त्याची कसोटी कारकीर्द संपल्याचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला गाबा कसोटीत मोठा धक्का, ‘या’ गोलंदाजाला नेलं हॉस्पिटलमध्ये; एक षटक टाकताच गेला होता मैदानाबाहेर

रोहितच्या ग्लोव्हजचा हा फोटो एक्सवर शेअर करत एका यूजरने लिहिले की, ‘रोहित शर्माने डगआउटसमोर हातमोजे टाकले आहेत. तो खूप निराश आहे. हे निवृत्तीचे लक्षण आहे का?’ एकाने लिहिले, ‘रोहित शर्माने डगआउटसमोर ग्लोव्हज टाकले. निवृत्तीचे संकेत?’

रोहित शर्माने बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळला नव्हता. पहिल्या मुलाच्या जन्मामुळे तो पर्थ कसोटीचा भाग होऊ शकला नाही. तो ॲडलेडमध्ये दुसरी कसोटी खेळला आणि त्यातही तो फ्लॉप ठरला. त्याने दोन्ही डावात ३८ चेंडूंचा सामना करताना केवळ ९ धावा केल्या. याचबरोबर तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ खोऱ्याने धावा करत होता, त्या रोकण्यासाठी कर्णधार रोहितकडे काहीच प्लॅन नाही, असं म्हणत चाहत्यांनी त्याच्या कसोटीतील नेतृत्त्वावरही प्रश्नचिन्ह उभारले आहे.

हेही वाचा – NZ vs ENG: ४२३ धावा! न्यूझीलंडचा इंग्लंडवर मोठा कसोटी विजय, निवृत्तीच्या सामन्यात टीम साऊदीला मिळालं विजयाचं खास गिफ्ट

रोहित शर्माने यापूर्वीच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या वर्षी, त्याने भारताला टी-२० विश्वचषक विजेतेपद मिळवून दिल्यानंतरच त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केलं. रोहित शर्मा आणि त्याच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने १७ वर्षांनंतर भारताला टी-२० विश्वविजेते बनवले. आता रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Story img Loader