Why Virat Kohli is Not Playing IND vs ENG 1st ODI: भारत वि इंग्लंड पहिला वनडे सामना नागपूरात खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक गमावली असून संघ प्रथम गोलंदाजीसाठी उतरला आहे. या पहिल्या वनडे सामन्यासाठी रोहित शर्माने नाणेफेकीनंतर प्लेईंग इलेव्हन जाहीर केली. प्लेईंग इलेव्हन जाहीर करताना रोहित शर्माने मोठा धक्का दिला. रोहित शर्माने पहिला वनडे सामना विराट कोहली खेळणार नसल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने यशस्वी जैस्वाल आणि हर्षित राणाला पदार्पणाची संधी दिली. यशस्वी जैस्वालला विराटच्या जागी पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. तर श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तर उपकर्णधार शुबमन गिलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे. तर मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांचं वनडे संघात बऱ्याच काळानंतर पुनरागमन झालं आहे.

रोहित शर्माने नाणेफेकीच्या वेळेस प्लेईंग इलेव्हन जाहीर करताना म्हणाला, “जैस्वाल आणि हर्षितला पदार्पणाची संधी मिळाली आहे. दुर्दैवाने विराट हा सामना खेळणार नाही, काल रात्री त्याला गुडघ्याच्या दुखापतीचा त्रास जाणवला आहे.” चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विराट कोहलीच्या दुखापतीचा भारताला नक्कीच धक्का बसणार आहे. पण विराटची दुखापत साधारण असावी सर्वांची इच्छा आहे.

पहिल्या वनडे सामन्यापूर्वी संघ सराव करत असताना विराट कोहली गुडघ्याला पट्टी (Knee Cap) घालून मैदानात दिसला होता. विराट कोहली फार कमी वेळेस दुखापतीमुळे संघाबाहेर पडला आहे. विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४ हजार धावा पूर्ण करण्यापासून अवघ्या काही धावा दूर आहे. गुरुवारी नाणेफेकीपूर्वी कोहली वॉर्मअप करताना दिसला, पण त्याने डाव्या गुडघ्यावर पट्टी घातली होती. विराट कोहली जुलै २०२२ नंतर प्रथमच दुखापतीमुळे एकदिवसीय सामना खेळताना दिसणार नाही. कोहली कंबरेच्या दुखापतीमुळे लंडनमधील ओव्हल येथील सामन्याला मुकला होता.

पहिल्या वनडेसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.