Rohit Sharma Greedy Asks Sunil Gavaskar: २०२३ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा बाद होण्याचा क्षण हा सामन्यातील महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला होता. रोहितने विकेट गमावण्याच्या आधी, भारताने एका षटकात जवळपास नऊ धावांच्या रन रेटने ९.४ षटकात ७६/२ पर्यंत मजल मारली होती. पण ट्रॅव्हिस हेडने टिपलेला झेल रोहितसह असंख्य भारतीय चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरला. पहिल्या १० षटकांमध्ये आठ चौकार आणि तीन षटकार मारत असलेला भारतीय संघ पुढील ४० षटकांमध्ये हवी तशी कमाल करूच शकला नाही आणि त्याचा परिणाम आपण सर्वांनीच पाहिला आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर सर्वांनी संघाचे सांत्वन केलेच पण भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी रोहितच्या बाद झाल्याबद्दल एक मुद्दा मांडला आहे.

ग्लेन मॅक्सवेलच्या दुसऱ्या षटकाचा सामना करत असलेल्या भारताच्या कर्णधाराने त्याला आधीच्या दोन चेंडूत एक षटकार आणि एक चौकार मारून अवघ्या तीन चेंडूत १० धावा केल्या होत्या. गावसकर यांनी म्हटल्याप्रमाणे, रोहित कदाचित आणखी जोखीम न पत्करता थोड्या वेळ टिकू शकला असता. पण रोहितची महत्त्वाची विकेट भारताने गमावली आणि मग संघाने फक्त २४० धावा केल्या, हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ६ गडी आणि ७ षटके बाकी असताना पूर्ण केलं आणि भारतातून वर्ल्डकप आपल्या मायदेशी नेला.

IND vs AUS Paine criticism of Gautam Gambhir ahead Border Gavaskar Trophy
IND vs AUS : ‘… तो भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही’, रिकी पॉन्टिंगनंतर टिम पेनने गौतम गंभीरवर साधला निशाणा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IND vs AUS Sourav Ganguly Says Rohit Sharma should be playing the Perth Test
IND vs AUS : ‘… तर रोहित पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही’, सौरव गांगुलीचे हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य
Ricky Ponting Hits Back at Gautam Gambhir over Virat Kohli Form Remarks Said He is quite a prickly character
Ricky Ponting on Gautam Gambhir: “स्वभावच इतका चिडचिडा…”, गौतम गंभीरबाबत रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य, विराट कोहलीच्या फॉर्मवरून रंगला वाद
Devendra fadnavis terror in Nagpur
Rohit Pawar: “नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची दहशत”, रोहित पवार यांचा गंभीर आरोप
Pat Cummins attend Coldplay concert with wife missed ODI series decider against Pakistan ahead of Border-Gavaskar Trophy Get Trolled
Pat Cummins: पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या मालिकेची तयारी सोडून कोल्डप्ले कॉन्सर्टला; ऑस्ट्रेलियाच्या विश्रांती देण्याच्या निर्णयावर टीका
Gautam Gambhir Backs KL Rahul With Big Statement Said How Many Teams Have a Player Like Him Border Gavaskar Trophy
Gautam Gambhir on KL Rahul: “केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत?”, गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

गावकसर यांनी स्पोर्टस्टारच्या एका कॉलममध्ये याविषयी मत व्यक्त केले आहे. ट्रॅव्हिस हेडने टिपलेला झेल भारताची ३०० हुन अधिक धावसंख्या करण्याची आशा संपवून गेला. अर्धशतकाच्या जवळ असलेल्या रोहित शर्माची ती विकेट पहिल्या पॉवरप्लेच्या अंतिम षटकात घेतली गेली. पॉवर प्ले दरम्यान ३०-मीटरच्या वर्तुळाबाहेर फक्त दोन क्षेत्ररक्षकांना परवानगी असते. त्यामुळे ही मोक्याची संधी असते. रोहितने आधीच षटकात एक षटकार आणि एक चौकार मारला होता आणि पॉवरप्ले पूर्ण होण्याआधी उरलेल्या काही चेंडूंचा फायदा घेऊन आणखी धावा करण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण शुबमन गिल आधीच बाद झाला असताना तो स्वतःवर अंकुश ठेवू शकला नसता का? रोहित शर्मा लोभी झाला होता का?”

रोहितने संपूर्ण स्पर्धा अशीच खेळली आहे. संपूर्ण विश्वचषकात त्याची भूमिका आक्रमक, प्रवर्तक अशी होती. पण रोहित शर्मा बाद झाल्यामुळे अन्य फलंदाजांची गती सुद्धा मंदावली होती. अगदी विराट कोहली आणि केएल राहुल यांनी अर्धशतके झळकावली असली तरी त्यांचा वेग फारच कमी होता. ऑस्ट्रेलियाने ही परिस्थिती चांगलीच ओळखली होती. हेड, मॅक्सवेल आणि मिचेल मार्श यांच्यात १० षटके वाटून पीचच्या संथपणाचा वापर करून ऑस्ट्रेलियाने खेळ आपल्या बाजूने वळवला. रोहित बाद झाला नसता तर, कुणास ठाऊक… कदाचित भारत आणखी 30 धावा करू शकला असता ज्याने भारताच्या आत्मविश्वासात आणि एकूणच निकालात फरक पडू शकला असता.

हे ही वाचा<< IND, AUS, NZ, SA.. विश्वचषकात ICC तर्फे प्रत्येक संघाला किती बक्षीस? पाकिस्तान, इंग्लंडची कमाई वाचून व्हाल चकित

गावसकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीविषयी लिहिले की, “ऑस्ट्रेलियासाठी पाचव्या गोलंदाजाची भूमिका नेहमीच फायद्याची सिद्ध झाली होती. आणि यावेळी, त्याने केवळ भारतीय कर्णधाराची महत्त्वपूर्ण विकेटच मिळवली नाही तर इतर भारतीय फलंदाजांना सुद्धा अधिक काळजीपूर्वक खेळायला लावले. यामुळे भारताला किमान ३० धावांचा फटका बसला आता त्या धावांमुळे फरक पडला असता का, हा वादाचा मुद्दा आहे. “