IND vs NEP, Rohit Sharma: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नेपाळविरुद्धच्या सामन्यानंतर प्रतिस्पर्धी संघाचा क्रिकेटर संदीप लामिछानेला ऑटोग्राफ दिला आणि त्यासोबत फोटोही काढला. त्यानंतर सर्व चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका केली. वास्तविक नेपाळचा शानदार फिरकी गोलंदाज संदीप लामिछाने याच्यावर बलात्काराचा आरोप झाला असून तो सध्या जामिनावर आहे.

भारत आणि नेपाळ यांच्यातील आशिया चषक २०२३ मधील महत्त्वपूर्ण सामना ४ सप्टेंबर रोजी कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने डकवर्थ (D/L) लुईस नियमानुसार नेपाळचा १० गडी राखून शानदार पराभव केला.

संदीप लामिछानेबद्दल जर सांगायचे झाले तर, त्याच्यावर २०२२ मध्ये एका अल्पवयीन मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. संदीप लामिछानेला ऑक्टोबर २०२२ मध्ये नेपाळ पोलिसांनी अटक केली होती आणि कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनवली होती. त्यानंतर १३ जानेवारी २०२३ रोजी त्याची जमिनीवर सुटका करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे त्याला नेपाळ क्रिकेट असोसिएशनने (एनसीए) निलंबितही केले होते, परंतु जेव्हा त्याची सुटका झाली तेव्हा त्याच्यावरील निलंबनही मागे घेण्यात आले.

मार्च २०२३ मध्ये परदेशात जाण्यासाठी नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर संदीप लामिछानेला आशिया चषक २०२३ मालिकेसाठी त्याची संघात निवड केली. त्यामुळे तो अजूनही त्या आरोपातून पूर्णपणे मुक्त झालेला नाही, त्याच्यावरील खटला अजूनही सुरूच आहे.

हेही वाचा: Football Kings Cup 2023: भारताकडून अंपायर्सने विजय हिरावून नेला? इराकविरुद्ध टीम इंडियाचा ७-६ने पराभव, फायनलचे स्वप्न भंगले

रोहित शर्माने संदीप लामिछानेच्या जर्सीवर सही केली

माहितीसाठी, ट्वीटरवर अनेक फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये रोहित शर्मा संदीप लामिछानेच्या जर्सीवर स्वाक्षरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर नेपाळ संघाचा फिरकीपटू आणि भारतीय संघाचे क्रिकेटरही एकत्र उभे राहून त्याच्यासोबत सेल्फी घेत आहेत, फोटो क्लिक करत आहेत. त्यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्मावर सोशल मीडियात जोरदार टीका होत आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला, स्कॉटलंडच्या खेळाडूंनी कीर्तिपूर येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यानंतर लामिछानेला बलात्काराच्या आरोपांमुळे त्याच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. नेपाळ संघाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी आशिया कप २०२३ मध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आणि त्यामुळे ते सुपर 4 साठी पात्र ठरू शकले नाहीत.

Story img Loader