Rohit Sharma has become the fastest ODI opener to complete 8000 runs: आशिया चषक २०२३ मधील सुपर फोर फेरीतील चौथ्या सामन्यासाठी भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या भारतीय संघाकडून रोहित शर्माने अर्धशतक झळकावत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

सलामीवीर म्हणून रोहित शर्मा सर्वात जलद ८००० धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला –

या सामन्यात रोहित शर्माने ४४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील ५१ वे अर्धशतक आहे. या खेळीच्या जोरावर रोहित शर्माने सलामीवीर म्हणून आपल्या ८००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याचबरोबर तो सर्वात जलद ८००० धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने एकदिवसीय सामन्यातील १६० डावांत हा कारनामा केला आहे. या बाबतीत त्याने हाशिम आमलाचा ​​विक्रम मोडला. आमलाने १७३ डावात ही कामगिरी केली होती. तर सचिन तेंडुलकरने १७९ डावात ही कामगिरी केली होती.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल
Sanju Samson Creates History With 2nd Consecutive T20I Century Becomes First Indian Batsman IND vs SA
Sanju Samson Century: संजू सॅमसनने शतकासह घडवला इतिहास, टी-२० इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू
Shreyas Iyer Double Century After 9 year for Mumbai Scores Career Best First Class 233 Runs Innings Mumbai vs Odisha
Shreyas Iyer Double Century: २४ चौकार, ९ षटकार, २३३ धावा… श्रेयस अय्यरने वादळी खेळीसह मोडला स्वत:चाच मोठा विक्रम, IPL लिलावापूर्वी टी-२० अंदाजात केली फटकेबाजी

वन डे क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण –

तत्पूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वन डे क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी केली आहे. रोहितने आतापर्यंत २४१ एकदिवसीय सामन्यातील २०५ डावात ४८.९१च्या सरासरीने आणि ९०.१९च्या स्ट्राईक रेटने १०.००० धावा पूर्ण केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर कुलदीप यादवचा वाढला आत्मविश्वास; म्हणाला, ‘मी निवृत्तीनंतरही…’

या काळात त्याने आपल्या बॅटने विरोधी संघातील गोलंदाजांना धू-धू धुतले आहे. त्यात त्याने ३० शतके आणि ५० अर्धशतके झळकावली आहेत. त्यात त्याने तीन वेळा द्विशतक देखील ठोकले आहे. त्याची सर्वोतम धावसंख्या देखील श्रीलंकेविरुद्ध २६४ एवढी आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्माने ४८ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५३ धावा केल्या.

हेही वाचा – IND vs SL, Rohit Sharma: हिटमॅनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! भारताचा कर्णधार रोहित शर्मा झाला १० हजारी मनसबदार

सामन्याबद्दल बोलायचे तर, भारतीय संघाच्या धावसंख्येने तीन विकेट गमावून १०० धावा पार केल्या आहेत. लोकेश राहुल आणि इशान किशन क्रीजवर आहेत. ड्युनिथ वेलल्गेने तीन विकेट घेत भारतीय संघाला अडचणीत आणले आहे. आता या जोडीवर टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याची जबाबदारी आहे. मोठे फटके खेळून डावखुऱ्या किशन वेललगेची लय खराब करायला आवडेल. २०षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात १०९ धावा आहे.