Rohit Sharma has become the fastest ODI opener to complete 8000 runs: आशिया चषक २०२३ मधील सुपर फोर फेरीतील चौथ्या सामन्यासाठी भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या भारतीय संघाकडून रोहित शर्माने अर्धशतक झळकावत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सलामीवीर म्हणून रोहित शर्मा सर्वात जलद ८००० धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला –
या सामन्यात रोहित शर्माने ४४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील ५१ वे अर्धशतक आहे. या खेळीच्या जोरावर रोहित शर्माने सलामीवीर म्हणून आपल्या ८००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याचबरोबर तो सर्वात जलद ८००० धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने एकदिवसीय सामन्यातील १६० डावांत हा कारनामा केला आहे. या बाबतीत त्याने हाशिम आमलाचा विक्रम मोडला. आमलाने १७३ डावात ही कामगिरी केली होती. तर सचिन तेंडुलकरने १७९ डावात ही कामगिरी केली होती.
वन डे क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण –
तत्पूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वन डे क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी केली आहे. रोहितने आतापर्यंत २४१ एकदिवसीय सामन्यातील २०५ डावात ४८.९१च्या सरासरीने आणि ९०.१९च्या स्ट्राईक रेटने १०.००० धावा पूर्ण केल्या आहेत.
हेही वाचा – IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर कुलदीप यादवचा वाढला आत्मविश्वास; म्हणाला, ‘मी निवृत्तीनंतरही…’
या काळात त्याने आपल्या बॅटने विरोधी संघातील गोलंदाजांना धू-धू धुतले आहे. त्यात त्याने ३० शतके आणि ५० अर्धशतके झळकावली आहेत. त्यात त्याने तीन वेळा द्विशतक देखील ठोकले आहे. त्याची सर्वोतम धावसंख्या देखील श्रीलंकेविरुद्ध २६४ एवढी आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्माने ४८ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५३ धावा केल्या.
सामन्याबद्दल बोलायचे तर, भारतीय संघाच्या धावसंख्येने तीन विकेट गमावून १०० धावा पार केल्या आहेत. लोकेश राहुल आणि इशान किशन क्रीजवर आहेत. ड्युनिथ वेलल्गेने तीन विकेट घेत भारतीय संघाला अडचणीत आणले आहे. आता या जोडीवर टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याची जबाबदारी आहे. मोठे फटके खेळून डावखुऱ्या किशन वेललगेची लय खराब करायला आवडेल. २०षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात १०९ धावा आहे.