Rohit Sharma has broken Virat Kohli’s record : भारतीय संघाचा कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्माने विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा टप्पा गाठला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला. रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात १३ धावा काढून बाद झाला. त्याला मोठी खेळी साकारता आली नाही, परंतु या डावात अवघ्या ७ धावा करुन त्याने विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडत त्याला मागे टाकले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम –

रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात १३ वा करत इतिहास रचला आहे. रोहित शर्माने त्याचा सहकारी आणि स्टार फलंदाज विराट कोहलीचा एक मोठा विक्रम उद्ध्वस्त केला आहे. विराट कोहलीला मागे टाकून रोहित शर्मा आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ३६ सामन्यांच्या ६० डावांमध्ये ३९.२१ च्या सरासरीने २२३५ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने या कालावधीत ४ शतके आणि १० अर्धशतके केली आहेत. विराट कोहलीची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील सर्वोत्तम धावसंख्या २५४* धावा आहे.

रोहित शर्माबद्दल बोलायचे तर त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये २९ सामन्यांच्या ४९ डावांमध्ये ४९.८२ च्या सरासरीने २२४२ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माने या कालावधीत ७ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये रोहित शर्माची सर्वोत्तम धावसंख्या २१२ धावा आहे.

हेही वाचा – VIDEO : शतकानंतरही अँजेलो मॅथ्यूजच्या पदरी आली निराशा, चौकार मारल्यानंतरही झाला बाद

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट आहे. जो रूटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ४९ सामन्यांच्या ८९ डावांमध्ये ४९.०६ च्या सरासरीने सर्वाधिक ४०२३ धावा केल्या आहेत. जो रूटने या कालावधीत १२ शतके आणि १६ अर्धशतके केली आहेत. जो रूटचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील सर्वोत्तम धावसंख्या २२८ धावा आहे.

हेही वाचा – IND vs ENG : “मला अजूनही आश्चर्य वाटते की…”, दुसऱ्या कसोटीतील खेळपट्टी पाहून सौरव गांगुलीने उपस्थित केला प्रश्न

डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज –

१. रोहित शर्मा- २२४२ धावा (४९ डाव)
२. विराट कोहली- २२३५ धावा (६० डाव)
३. चेतेश्वर पुजारा- १७६९ धावा (६२ डाव)
४. अजिंक्य रहाणे – १५८९ धावा (४९ डाव)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma has broken virat kohlis record for most runs by india in the wtc tournament in ind vs eng 2nd test vbm