Rohit Sharma has opened up about his interactions with Virat and Rahul: भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी येणारे दोन महिने खूप महत्त्वाचे आहेत. टीम इंडिया सध्या रोहितच्या नेतृत्वाखाली आशिया कप खेळत आहे. यानंतर टीम इंडियाला ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप २०२३ मध्ये सहभागी व्हायचे आहे. हिटमॅनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला या दोन्ही ट्रॉफी आपल्या नावावर करायच्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्व क्रिकेट चाहत्यांना माहीत आहे की, कोणत्याही महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी ड्रेसिंग रूममधील वातावरण संघाच्या कामगिरीमध्ये मोठी भूमिका बजावते. अलीकडे, एका मुलाखतीदरम्यान, भारतीय कर्णधाराने त्याच्या आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय ड्रेसिंग रूममधील वातावरणाबद्दल बोलले. द्रविडला संघात कोणत्याही प्रकारचा गैरसमज नको आहे, असा खुलासाही त्याने केला. त्याबरोबर विराट कोहलीशीही कोणत्या विषयावर चर्चा होते, याबाबत सांगितले आहे.

रोहित शर्माने विमल कुमारच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की त्याची आणि विराटची फलंदाजीबद्दल काय चर्चा होते. रोहित म्हणाला, “जेव्हा तो विराटसोबत क्रिझवर असतो, तेव्हा फक्त चर्चा होते की कोण गोलंदाजी करत आहे. त्याचबरोबर तो कशी गोलंदाजी करत आहे.” जेव्हा त्याला पुढे विचारण्यात आले की, सर्वसाधारणपणे त्यांच्यात फलंदाजीबद्दल काय चर्चा होते. भारतीय कर्णधार म्हणाला, ‘बघा, या मालिकेत काय करायचे यावर आम्ही चर्चा करतो. आम्ही जेव्हा मालिका दर मालिका भेटतो, तेव्हा आम्ही त्यानुसार बोलतो.”

हेही वाचा – World Cup 2023: आयसीसीने विश्वचषकासाठी सामना अधिकाऱ्यांची यादी केली जाहीर, पाहा भारताकडून कोणाला मिळाली संधी

राहुल द्रविड बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “राहुल भाईचा जिथपर्यंत संबंध आहे, मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. सर्व प्रथम ते एक माणूस आहेत आणि नंतर स्पष्टपणे एक क्रिकेटर आहेत. त्याला या प्रकरणात खेळाडू, सपोर्ट स्टाफ किंवा इतर कोणामध्येही गैरसंवाद नको आहे. त्यांचा पहिला नियम असा आहे की, प्रकरण काहीही असले तरी त्याची माहिती संबंधित व्यक्तीला दिली जाईल. आमचे नाते खुले आहे, आम्ही गोष्टी आणि खेळाडूंबद्दल बोलत राहतो. मी त्याच्याबरोबर माझा वेळ खरोखरच एन्जॉय केला आहे.”

हेही वाचा – Asia Cup 2023: भारत-पाक सामन्यासाठी पीसीबीने घेतला मोठा निर्णय! सुपर फोरमधील सामना पावसामुळे वाया गेला, तर ‘असा’ लागणार निकाल

दरम्यान, भारताने दुसऱ्या गटाच्या सामन्यात नेपाळचा दहा गडी राखून पराभव करून आशिया चषक २०२३ च्या सुपर फोर टप्प्यासाठी पात्र ठरले आहे. मेन इन ब्लू रविवारी १० सप्टेंबर रोजी त्यांच्या पहिल्या सुपर फोर सामन्यात आर.के. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे त्यांचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. उभय संघांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma has opened up about his interactions with virat kohli and rahul dravid vbm