IND vs AUS Rohit Sharma: सिडनीमध्ये खेळल्या जात असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या अखेरच्या सामन्यात रोहित शर्माने स्वत: विश्रांती घेण्याचा मोठा निर्णय घेतला. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करत आहे. बुमराहने नाणेफेकीच्या वेळी सांगितले होते की, रोहितने विश्रांती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांचं वेगळंच म्हणणं आहे. रोहितने शेवटचा कसोटी सामना खेळला आहे आणि आता भारताने त्याच्यापासून पुढे जावे, असे त्यांचे मत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेलबर्न कसोटी सामन्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ड्रेसिंग रूममधील संभाषण व्हायरल झालं होतं. रोहित शर्मा सातत्याने खराब फॉर्ममधून जात आहे. त्याच्याकडून संघ अडचणीत असताना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण रोहितला मैदानावर टिकून चांगली कामगिरी करता आली नाही. यानंतर रोहितने स्वत: विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – IND vs AUS : विराटने पुन्हा केलं निराश! मालिकेतील ८ पैकी ७ डावात एकाच प्रकारे आऊट, पाहा VIDEO

सुनील गावस्कर स्टार स्पोर्टशी रोहित शर्माबाबत बोलताना म्हणाले, माझ्यामते भारत कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकणार नाही. मला वाटतंय की मेलबर्न कसोटी ही रोहितची शेवटची कसोटी ठरेल. पुढील जागतिक कसोटी चॅम्पियनशिप इंग्लंड मालिकेपासून सुरू होईल आणि यासाठी टीम इंडिया २०२७ च्या फायनलपर्यंत खेळू शकेल असा पर्याय शोधेल. भारत अंतिम फेरीत पोहोचेल की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण मला वाटतं की निवड समिती तेच करेल. त्यामुळे मला सध्याच्या घडीला वाटतंय की आपण रोहितला शेवटचा कसोटी सामना खेळताना पाहिलं आहे.”

हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माचा मोठा निर्णय! शेवटच्या कसोटीत स्वत: घेतली विश्रांती, ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी लागली वर्णी

भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुनील गावस्कर यांच्याशी सहमती दर्शवली आणि म्हणाले, “जर मायदेशात यानंतर कसोटी मालिका असणार असती, तर त्याने कसोटी सामने खेळत राहण्याचा विचारही केला असता. पण मला वाटतं की तो या कसोटी सामन्यानंतर निवृत्त होईल. तो ३८ वर्षांचा आहे आणि तो आता तरुण राहिलेला नाही. असं नाहीय की भारताकडे युवा खेळाडू नाहीत.”

हेही वाचा – India 2025 Cricket Calendar: इंग्लंड दौरा, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्डकप…, भारताच्या क्रिकेट सामन्यांचं २०२५ मध्ये कसं असणार वेळापत्रक?

हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण जर टीम इंडियाने हा सामना गमावला तर त्यांचे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याचे स्वप्न भंगणार आहे. भारत जिंकला तरी श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका ऑस्ट्रेलियन संघ हरेल, अशी प्रार्थना करावी लागेल. या स्थितीत भारत अंतिम फेरीत पोहोचू शकतो. गावसकर यांनी सांगितल्याप्रमाणे, भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जाणं कठिण असणार आहे आणि जर टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचली नाही तर मेलबर्न कसोटी ही रोहितची शेवटची कसोटी ठरेल, कारण टीम इंडिया अंतिम फेरीसाठी पात्र ठरली नाही तर रोहित कसोटी क्रिकेटला अलविदा करेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma has played his last test in melbourne india will move on said sunil gavaskar ind vs aus sydney test bdg