Rohit Sharma’s Reaction after World Cup Schedule 2023 Announced: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. त्याचवेळी टीम इंडिया ८ ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. दरम्यान, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकावर भारतीय कर्णधार रोहित शर्माची प्रतिक्रिया आली आहे. तो काय म्हणाला ते जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “घरच्या मैदानावर विश्वचषक खेळणे हा एक चांगला अनुभव असेल. भारताने १२ वर्षांपूर्वी येथे विजय मिळवला होता. मला माहित आहे की देशभरातील चाहते यावेळी आम्हाला मैदानात उतरताना पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाहीत.”

आमचे सर्वोत्तम देण्यास उत्सुक आहोत –

हिटमॅन पुढे म्हणाला, “हा विश्वचषक खूप स्पर्धात्मक असणार आहे कारण आता खेळ बदलला आहे. संघ पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक उर्जेने खेळत आहेत. हे सर्व जगभरातील चाहत्यांसाठी चांगले संकेत आहेत, जे त्यांना अनेक रोमांचक क्षणांचे वचन देतात. आम्ही या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये चांगली तयारी करण्यास आणि आमचे सर्वोत्तम देण्यास उत्सुक आहोत.”

हेही वाचा – Lionel Messi: ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विक्रम मोडण्यावर मेस्सीचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “मी आता यावर…”

एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघाचे वेळापत्रक –
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान – ११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान – १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश – १९ ऑक्टोबर, पुणे<br>भारत विरुद्ध न्यूझीलंड – २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड – २९ ऑक्टोबर, लखनऊ
भारत विरुद्ध क्वालिफायर – २ नोव्हेंबर, मुंबई<br>भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध क्वालिफायर – ११ नोव्हेंबर, बंगळुरू

१५ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान आमनेसामने –

भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबरला भारत आणि अफगाणिस्तानचे संघ आमनेसामने असतील. यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ १५ ऑक्टोबरला पाकिस्तानशी भिडणार आहे. भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma has reacted after the odi world cup 2023 schedule was announced vbm
Show comments