Rohit Sharma has set three parameters for Playing XI Selection: आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी मीडियासमोर येऊन संघाची घोषणा केली आणि पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या १५ सदस्यीय संघात आश्चर्यकारक नावे नव्हती. सर्व १५ खेळाडू सध्या श्रीलंकेत आशिया कपमध्ये खेळत आहेत. यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माने या १५ पैकी प्लेइंग इलेव्हनसाठी खेळाडूंची निवड कशी केली जाईल, हे देखील सांगितले.

हिटमॅनने वर्ल्ड कपसाठी तीन पॅरामीटर्स केले सेट –

यादरम्यान रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनसाठी तीन पॅरामीटर्स सेट केले आहेत. रोहित शर्मा आणि सांगितले की, जो खेळाडू तीन पॅरामीटर्स पूर्ण करेल त्यालाच प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल. रोहितचे ते तीन पॅरामीटर्स ही सांगितेल. विरोधी संघ, अलीकडचा फॉर्म आणि कामगिरी. रोहित म्हणाला की, प्लेइंग इलेव्हन निवडण्याआधी आपण हे लक्षात ठेवू की विरोधी संघ कोणता? तसेच, खेळाडूचा अलीकडचा फॉर्म आणि कामगिरी काय आहे

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
मराठा समाज ८० टक्के हिंदुत्ववादी; महायुतीलाच पाठिंबा मिळेल!उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाम विश्वास
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’

विश्वचषकात सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह खेळणार –

रोहित शर्माने सांगितले की, आम्ही या तीन पॅरामीटर्सवर खेळाडूंचे मूल्यमापन करू आणि त्यानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाचा समावेश करायचा हे ठरवू. रोहित म्हणाला की, वर्ल्ड कपमध्ये आमचा प्रयत्न सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह खेळण्याचा असेल. यावेळी युजवेंद्र चहल आणि संजू सॅमसनबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, क्रिकेटमध्ये असे घडते. जेव्हा आम्ही संघ तयार करतो तेव्हा आम्हाला कोणालातरी बाहेर ठेवावे लागते.

हेही वाचा – World Cup 2023: टीम इंडियाच्या विश्वचषक संघात निवड न झाल्याने युजवेंद्र चहलची आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

विश्वचषकासाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.