Rohit Sharma batting practice video post on Instagram : टीम इंडियाला आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद पटकावून दिल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीची चमक फिकी पडली आहे. श्रीलंकेतील एकदिवसीय मालिका हरल्यावर त्याच्या कर्णधारपद आणि फलंदाजी या दोन्हींवर प्रश्न उपस्थित झाले होते. यानंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभूत झाल्यानंतर त्याच्या फलंदाजीसह नेतृत्त्वावर प्रश्नचिन्हा उपस्थि झाले आहे. या सर्व कटू आठवणी मागे सोडत नव्याने सराव सुरु केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
रोहित शर्माने शेअर केला सरावाचा व्हिडीओ –
रोहित शर्माने इंस्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो फलंदाजीचा कसून सराव करताना आणि जबरदस्त फटकेबाजी करतान दिसत आहे. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर रोहित शर्मा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबईच्या रणजी संघासोबत सराव करत आहे. तो पार्कमध्ये धावतानाही दिसला होता. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या आवडता पुल शॉट्स तितक्याच सहजतेने खेळताना दिसत आहे. यासह त्याने ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर प्रथमच इन्स्टावर पोस्ट केली आहे.
रोहितच्या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस –
त्याने दोन इमोजीसह व्हिडिओ पोस्ट केला. यानंतर त्याच्या चाहत्यांनी व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या व्हिडीओवर अल्पावधीतच जवळपास दहा लाख लाइक्स आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत. श्रीलंकेत एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहे. यानंतर तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ खेळताना दिसणार आहे. भारत या स्पर्धेतील आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारत आपला पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे, तर दुसरा सामना २३ फेब्रुवारीला पाकिस्तानशी होणार आहे. या शानदार सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. यानंतर भारत २ मार्चला शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडचा सामना करणार आहे. जर भारत अंतिम फेरीत पोहोचला तर तो सामनाही दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल.