Rohit Sharma Video of Naman Awards: बीसीसीआय नमन अवॉर्ड्स २०२४ चा पुरस्कार सोहळा रविवारी १ फेब्रुवारीला पार पडला. या सोहळ्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंपासून ते भारतीय संघाचे आजी माजी क्रिकेटपटू देखील हजर होते. यादरम्यान रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, समृती मानधना आणि जेमिमा रोड्रीग्ज या खेळाडूंनी एकमेकांना काही मजेशीर प्रश्न विचारले. दरम्यान रोहितच्या उत्तराने सोहळ्यात सगळेच हसू लागले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाचा वनडे आणि कसोटी कर्णधार असलेला रोहित शर्मा किती विसरभोळा आहे, याचा प्रत्यय आपण सर्वांनीच कायम घेतला आहे. हॉटेलमध्ये वस्तू विसरण्यापासून ते क्रिकेटच्या मैदानावर नाणेफेक जिंकल्यानंतर काय निवडणार आणि प्लेईंग इलेव्हनमध्ये कोण कोण खेळणार हे देखील रोहित कधीकधी विसरतो. ज्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा

बीसीसीआय पुरस्कार सोहळ्यात स्मृती मानधना रोहित शर्माला काही प्रश्न विचारत होती, यादरम्यान तिने विचारलं की, “असा एक छंद किंवा सवय आहे जी गेल्या काही दिवसांमध्ये तू आत्मसात केली आहेस आणि त्यावरून तुझे इतर सहकारी तुझी मस्करी करतात.”

यावर उत्तर देताना रोहित म्हणाला, “मला माहित नाही, पण हे सगळे मी गोष्टी विसरतो त्यावरून मला चिडवतात, पण हा काही छंद नाहीय म्हणा पण तू जस चिडवण्यावरून विचारलं तर हो हे सर्व जण मला मी गोष्टी विसरतो त्यावरून चिडवतात – जस की मी माझं पॉकेट विसरतो, पासपोर्ट विसरतो पण हे सगळं खोटं आहे…” रोहितचे हे उत्तर ऐकून त्याचे सर्व टीममेट्स हसू लागले.

स्मृतीने रोहितचं उत्तर ऐकून त्यालाच एक उपप्रश्न केला की, “आतापर्यंतची सर्वात मोठी कोणती गोष्ट आहेस, जी तू विसरला आहेस?” यावर सुरूवातीला उत्तर देताना रोहित थोडा विचारात पडला आणि मग म्हणाला, मी ते इथे सांगू शकत नाही, जर हा कार्यक्रम लाईव्ह सुरू असेल तर माझी पत्नी पण पाहत असेल त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मी माझ्यापाशी ठेवतो. रोहित शर्माच्या या उत्तराने पुन्हा एकदा सर्वच जण हसू लागले. तितक्यात हार्दिक म्हणाला की, तो बसलाय तिथे काही विसरला नसेल याची खात्री करेल.

बीसीसीआयचे नमन अवॉर्ड्स २०२४ मध्ये जसप्रीत बुमराहला सर्वाेत्कृष्ट पुरूष क्रिकेटपटू आणि स्मृती मानधनाला सर्वाेत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला. तर सचिन तेंडुलकरला जीवनगौरव पुरस्कार देऊन बीसीसीआयने सन्मानित केलं. याशिवाय रविचंद्रन अश्विनला बीसीसीआयने स्पेशल अवॉर्ड देत त्याचा सन्मान केला.