Rohit Sharma Record in IND vs SL 1st ODI: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टी-२० विश्वचषकानंतर टी-२० मधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित आता वनडे सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यानंतर प्रथमच वनडे सामन्यासाठी मैदानात उतरला आहे. पण मोठ्या ब्रेकनंतर मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने (Rohit Sharma) आज श्रीलंकेविरुद्ध आणखी एक नवा विक्रम रचला. मोठ्या ब्रेकनंतर मैदानात उतरलेल्या रोहित शर्माचा फॉर्म मात्र कमाल आहे.
Rohit Sharmaची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी
श्रीलंकेविरुद्ध खेळताना रोहित शर्माने असा विक्रम केला आहे, रोहितच्या या रेकॉर्डपर्यंत कोणीच पोहोचू शकणार नाही. कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा रोहित शर्मा जगातील पहिला कर्णधार ठरला आहे. रोहित शर्माने पहिल्या वनडे सामन्यात ४७ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकारांसह ५८ धावा केल्या आहेत. सलामीला उतरताच पहिल्याच षटकात रोहितने गगनचुंबी षटकार लगावत डावाला सुरूवात केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून रोहित शर्मा आता सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनचा विक्रम मोडीत काढला. कोलंबोमध्ये खेळल्या जात असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहितने तिसरा षटकार लगावत ही कामगिरी केली. रोहित शर्माने कर्णधार म्हणून आतापर्यंत एकूण १२४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये आता त्याच्या नावावर २३४ षटकार आहेत. इयॉन मॉर्गन या यादीत १९८ सामन्यात इंग्लंडचे कर्णधारपद भूषवले आणि २३३ षटकार मारले.
रोहित शर्मा आणि इऑन मॉर्गननंतर या यादीत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आहे. त्याने ३३२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. या दरम्यान फिनिशर धोनीने २११ षटकार लगावले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. पॉटिंगने आपल्या कारकिर्दीत ३२४ सामन्यांमध्ये कर्णधार असताना १७१ षटकार ठोकले आहेत. म्हणजेच या सर्व कर्णधारांमध्ये रोहित शर्माने केवळ सर्वाधिक षटकारच मारले नाहीत तर त्या सर्वांपेक्षा कमी सामने खेळले आहेत. म्हणजेच रोहित शर्मासाठीही हे मोठे यश आहे.
Rohit Sharma Most Six as Captain: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे कर्णधार
२३४ – रोहित शर्मा
२३३- इऑन मॉर्गन
२११ – एमएस धोनी
१७१ – रिकी पाँटिंग
१७० – ब्रेंडन मॅक्युलम
एकदिवसीय सामन्यांच्या पॉवरप्लेमध्ये भारतासाठी सर्वाधिक अर्धशतके
७ – वीरेंद्र सेहवाग
३ – रोहित शर्मा
१ – सचिन तेंडुलकर
१ – गौतम गंभीर<br>१ – रॉबिन उथप्पा