टी-२ विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीतील इंग्लंडविरुद्धच्या पराभवाचे दु:ख भारतीय चाहते अजूनही विसरलेले नाहीत. टीम इंडिया बाहेर पडल्यानंतर कर्णधार रोहित शर्मावरही बरीच टीका होत आहे. मात्र याच दरम्यान पंजाबी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता गॅरी संधूने असा खुलासा केला आहे, ज्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवानंतर गॅरी संधूने लाइव्ह येऊन ही संपूर्ण घटना उघड केली. गॅरी संधूने सांगितले की, रोहित शर्माने अकड दाखवली नसती, तर टीम इंडिया हरली नसती. गॅरी त्याच्या लाइव्हवर म्हणाला, ”टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर झाली. रोहित अकड दाखवली नसती, तर असे घडले नसते. भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्याच हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो. सकाळी ते त्यांच्या सरावाला जात होते आणि आमची फ्लाइट जात होतो. रोहित शर्माला बाहेर येताना पाहून मी हात वर केला आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला सत श्री अकाल म्हणाले, पण रोहितला कदाचित माझे सत श्री अकाल बोलणे आवडले नाही आणि तो मला न बोलता बसमध्ये जाऊन बसला.”

हेही वाचा – IPL 2023: बेन स्टोक्स आयपीएल मिनी-लिलावासाठी नाव देणार का? सर्व फ्रँचायझी पाहत आहेत आतुरतेने वाट

पुढे बोलताना संधू म्हणाल, “तिथे लोक किंवा गर्दी असती तर मी समजू शकलो असतो, पण आम्ही तीन-चार लोक होतो आणि तरीही त्यानी माझ्याकडे दुर्लक्ष केले. तिथे असलेले माझे साथीदारही माझ्यावर हसले. मी तिथे अर्शदीपची वाट पाहत होतो, मला सांगण्यात आले की अर्शदीप मला भेटू इच्छितो पण मी त्यांना भेटायला गेलो नाही. कारण प्रत्येकाची स्वतःची प्रायव्हसी असत, पण शर्मा साहेबांनी त्याचा मोठा चाहता गमावला.”

सध्या गॅरी संधूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचबरोबर या संपूर्ण घटनेवर रोहित शर्माने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यामुळे रोहितची बाजू जाणून घेतल्याशिवाय काहीही बोलणे चुकीचे ठरेल. पंजाबी गाण्यांव्यतिरिक्त गॅरी संधूने बॉलिवूडमध्येही अनेक गाणी गायली आहेत आणि चाहत्यांना त्यांची गाणी खूप आवडली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma ignored punjabi singer garry sandhu in adelaide semi final against england video vbm