India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजच्या स्थानिक विंड बॉल महिला संघाची कर्णधार रोहित शर्माला भेटायला पोहोचली. कॅरेनने रोहितचे खूप कौतुक केले आणि सांगितले की, ती त्याची किती मोठी फॅन आहे. तिने रोहितचे वर्णन सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असे केले. याबरोबरच तिने तिच्या खेळाविषयी म्हणजे विंड बॉल क्रिकेटबद्दलही सांगितले. विंड बॉल क्रिकेट हे सामान्यतः भारतात टेनिस बॉल क्रिकेट म्हणून ओळखले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याचा तिसरा दिवस संपल्यानंतर विंडीजच्या स्थानिक विंड बॉल संघाचा कर्णधार ‘केरन ने रेव’ हिने आपल्या बैठकीत रोहितचे खूप कौतुक केले. सामना संपल्यानंतर रोहित बसमध्ये परतत असताना केरनने त्याला थांबवून भेटण्याची विनंती केली. यानंतर रोहितनेही तिच्याशी चांगला संवाद साधला. ‘केरन ने रेव’ रेव्ह स्पोर्ट्सशी रोहित आणि तिच्या संभाषणाबद्दल सांगितले. तिने भारतीय कर्णधाराला सांगितले की, “ती विंड बॉल क्रिकेट संघाची कर्णधार आहे.” ज्यावर रोहित शर्मा म्हणाला की, “मी याबद्दल खूप ऐकले आहे, परंतु ते कधीही खेळलो नाही.”

हेही वाचा: IND A vs PAK A: बुमराहच्या वेळेची पुनरावृत्ती? हंगरगेकरचा नो बॉल अन् चाहत्याच्या मनात धकधक! भारतापुढे ३५३ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य

याशिवाय केरनने रोहितला सांगितले की, “रोहित हा सर्वोत्तम कर्णधार म्हणून टीम इंडियाला पुढे नेत आहे.” केरन रोहितला सांगते की, “तिने देखील महिला विंड बॉल क्रिकेट रिबर्थची कर्णधार म्हणून यशस्वी कार्यकाळ पार पाडला आहे.” केरन म्हणाली, “मी त्याला एक चांगला नेता म्हणून पाहतो, त्याचे रेकॉर्ड स्वतःच बोलतात की तो सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. आयपीएल, मुंबई इंडियन्स ते टीम इंडिया असा त्याचा प्रवास सर्व काही सांगून जातो. रोहित शर्मा हा जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे.”

हेही वाचा: IND vs WI: “माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे…”, इशान, शुबमन आणि जैस्वाल यांची ‘मिस वर्ल्ड’सोबत खास भेट, पाहा Video

सामन्यात काय झाले?

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ४३८ धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात यजमान संघाने (वेस्ट इंडिज) ५ विकेट्सच्या मोबदल्यात २२९ धावा केल्या आहेत. तरीही कॅरेबियन संघ २०९ धावांनी मागे आहे. भारताने पहिल्या डावात ४३८ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये विराट कोहलीने १२१ धावांची शतकी खेळी केली आणि कर्णधार रोहित शर्माने ८० धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma is the best player said the captain of the wi wind ball team after meeting the indian captain avw
Show comments