२०१९ विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सामन्यात, भारतीय सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारतीय संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. या खेळीदरम्यान रोहित-लोकेश राहुल जोडीने सचिन तेंडुलकर आणि नवजोतसिंह सिद्धू या जोडीचा विक्रम मोडीत काढला.

१९९२ साली झालेल्या स्पर्धेत भारताच्या सचिन-सिद्धू जोडीने पहिल्या विकेटसाठी पाकिस्तानविरुद्ध ९० धावांची भागीदारी केली होती. आतापर्यंत विश्वचषक इतिहासात भारताची पाकिस्तानविरुद्ध ही सर्वोत्तम भागीदारी मानली जात होती. मात्र मँचेस्टरच्या सामन्यात लोकेश राहुल-रोहित शर्मा जोडीने हा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. वन-डे क्रिकेटमधली या जोडीची आकडेवारी ही त्यांच्या सर्वोत्तम असण्याची साक्ष देत आहे.

दरम्यान, रोहित शर्माने ११३ चेंडूत १४० धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. या खेळीसाठी रोहितला सामनावीराता किताब देऊन गौरवण्यात आलं.

अवश्य वाचा – Ind vs Pak : आधी टीम इंडिया, नंतर पाऊस ! डबल सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तान घायाळ

Story img Loader