India vs Australia 4thTest Match Updates: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावर अनेकदा चर्चेचा विषय बनतो. खेळाडूंशी गमतीशीरपणे बोलणे असो किंवा एखाद्या गोष्टीवर रागावणे असो… रोहितची शैली ही एक हेडलाईन बनते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही असेच दृश्य समोर आले आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहितला पाहताच पंचांनीही प्रतिक्रिया दिली –

खरं तर, सहाव्या षटकाच्या शेवटच्या सत्रात एक घटना घडली. जेव्हा रोहितने नॅथन लायनच्या चेंडूवर एक धाव घेतली. तेव्हा एक प्रेक्षक साइटच्या स्क्रीनसमोर आला. यामुळे रोहितचे लक्ष विचलित झाले आणि तो संतापला. धाव पूर्ण करण्याआधीच रोहित ओरडला, ‘ओये हटा उसको…’ रोहितला संतापलेला पाहून पंचाने चाहत्याला बाजूल हटवण्याचे संकेत दिले. रोहित शर्मा इतका संतापलेला होता, सर्व राग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्याची ही रिअॅक्शन क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

सामन्याबद्दल बोलायचे, तर टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४८० धावांवर गुंडाळला. अश्विनने शानदार गोलंदाजी करत ६ बळी घेतले. उस्मान ख्वाजाचे द्विशतक हुकले, त्याला अक्षर पटेलने १८० धावांवर पायचित करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कॅमेरून ग्रीननेही शानदार फलंदाजी करत शतक झळकावले.

हेही वाचा – IPL 2023: नव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सची नवीन जर्सी लॉन्च; चाहत्यांनाही फक्त ‘इतक्या’ रुपयांत उपलब्ध

भारतीय संघाने दुसऱ्या दिवस अखेर, भारताने १० षटकांत बिनबाद ३६ धावा केल्या. रोहित शर्माने १७ धावा केल्या, तर शुबमन गिल २७ चेंडूत १८ धावा करून नाबाद राहिला.. भारतीय संघ अजूनही ४४४ धावांनी पिछाडीवर आहे. तिसर्‍या दिवशी टीम इंडिया कशी काम करते हे पाहणे रंजक ठरेल.

आर अश्विनने अनिल कुंबळेचा विक्रम मोडला –

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत आर अश्विन आता पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्याने अनिल कुंबळेला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले, ज्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत या ट्रॉफीमध्ये २० सामन्यांत ३८ डावांत एकूण १११ बळी घेतले. या ट्रॉफीमध्ये कुंबळेची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे एका डावात १४१ धावांत ८ बळी, तर सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे १८१ धावांत १३ विकेट्स.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma lashed out at a fan after getting distracted while running video viral in ind vs aus 4th test vbm