India squad announced for the first two matches of the Test series against England : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. ध्रुव जुरेलने टीम इंडियात प्रवेश केला आहे. तर अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला बाहेर ठेवण्यात आले आहे. यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचाही टीम इंडियात समावेश करण्यात आला नाही. युवा खेळाडू यशस्वी जैस्वालला संधी मिळाली आहे.

मोहम्मद शमीला संघात स्थान मिळाले नाही –

भारत आणि इंग्लंड यांच्यात २५ जानेवारीपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये होणार आहे. भारताने पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज शमी संघाचा भाग नाही. २०२३ च्या विश्वचषकात शमीने शानदार गोलंदाजी केली होती. त्याला नुकतेच अर्जुन पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. तरीही तो संघाबाहेर आहे.

Rohit Sharma to miss first Test against Australia Jasprit Bumrah to captain in Perth Devdutt Padikkal will be added in Team
IND vs AUS: रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर, BCCIला दिली माहिती; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूला संघात स्थान मिळणार
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
Gautam Gambhir has challenged Australia ahead Border-Gavaskar Trophy
Gautam Gambhir : ‘कोणत्याही प्रकारची खेळपट्टी तयार करा, आम्ही…’, गौतम गंभीरने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला दिले आव्हान
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?
nathan mcswinney
Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर

बुमराह-सिराजचे टीम इंडियात पुनरागमन –

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजचे पुनरागमन झाले आहे. त्यांचा अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत सहभागी नाहीत. दोघांनाही ब्रेक देण्यात आला आहे. आवेश खान आणि मुकेश कुमार यांना स्थान निर्माण करण्यात यश आले आहे. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचाही टीम इंडियात समावेश आहे. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे अष्टपैलू खेळाडूही इंग्लंडविरुद्ध टीम इंडियात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. मात्र इशान किशनला संधी देण्यात आलेली नाही. इशानबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. पण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले होते की, तो स्वत: ब्रेकवर गेला आहे.

हेही वाचा – IND vs AFG : ‘अक्षर पटेलचे टी-२० विश्वचषकाचे तिकीट पक्के ‘, माजी भारतीय दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

ध्रुव जुरेलची टीम इंडियात एन्ट्री –

ध्रुव जुरेलने टीम इंडियात प्रवेश केला आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये तो उत्तर प्रदेशकडून खेळतो. २२ वर्षीय ध्रुव शेष भारत आणि अंडर १९ इंडिया अ संघाकडूनही खेळला आहे. त्याची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील चांगली राहिली आहे. ध्रुवने १५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये ७९० धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. यासोबतच त्याने १० लिस्ट ए सामनेही खेळले आहेत. ध्रुव जुरेलने इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना शानदार कामगिरी केली आहे.

हेही वाचा – WPL 2024 : महिला प्रीमियर लीगबद्दल मोठी अपडेट, ‘या’ दोन शहरांमध्ये खेळवला जाणार दुसरा हंगाम

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.