दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने यजमान न्यूझीलंडवर ७ गडी राखून मात करत ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. न्यूझीलंडने दिलेलं १५९ धावांचं आव्हान भारताने कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर पूर्ण केलं. रोहितने २९ चेंडूत धडाकेबाज ५० धावा काढल्या. त्याच्या या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

या खेळीदरम्यान रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीला मागे टाकत एका विक्रमाची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा चौथ्या स्थानावर पोहचला आहे. रोहितच्या खात्यात ३४९ षटकार जमा आहेत, तर धोनीच्या खात्यात ३४८ षटकार जमा आहेत.

रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर शिखर धवन, ऋषभ पंत, महेंद्रसिंह धोनी यांनी भारतीय संघाला विजय मिळवून दिला. भारतीय संघाचा न्यूझीलंडमधला हा पहिली टी-२० विजय ठरला आहे. या मालिकेतला अखेरचा सामना रविवारी होणार असून भारतीय संघाला वन-डे पाठोपाठ टी-२० मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

Story img Loader