Rohit Sharma IND vs AUS: भारत वि ऑस्ट्रेलियामध्ये येत्या नोव्हेंबरपासून बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळवली जाणार आहे. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन त्यांच्या मायदेशात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांपैकी एक सामना खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, रोहित पहिल्या किंवा दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे म्हटले आहे. रोहित सुरूवातीच्या दोन कसोटी सामन्यांपैकी एक सामना खेळणार नसल्याची माहिती त्याने बीसीसीआयला दिली आहे.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वीच रोहित शर्मा एक सामना खेळणार नसल्याचे म्हटले वास्तविक, कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या किंवा दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. पीटीआयशी बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, वैयक्तिक कारणांमुळे मालिकेतील पहिला किंवा दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी तो उपलब्ध नसल्याचे रोहितने बीसीसीआयला सांगितले आहे. याबाबत अजूनतरी काही निश्चित माहिती मिळालेली नाही. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वी जर रोहितचे वैयक्तिक काम आटपले तर तो पाचही कसोटी खेळू शकतो. येत्या काही दिवसांत याबाबत स्पष्ट माहिती मिळेल.

हेही वाचा – Harry Brook Triple Century: मुलतान का नया सुलतान! हॅरी ब्रुकने झळकावले कसोटीतील दुसरे सर्वात वेगवान त्रिशतक, वीरेंद्र सेहवागचा महाविक्रमही मोडला

रोहितचे नेतृत्त्व आणि त्याची फलंदाजी पाहता टीम इंडियासाठी नक्कीच ही चांगली बातमी नसणार आहे. बांगलादेश मालिकेतील दुसऱ्या कसोटीनंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले आहे. ड्रॉ होणारा सामना रोहित शर्मा आणि त्याच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने जिंकला आणि त्यात रोहितने ज्याप्रकारे संघाचे नेतृत्त्व केले आणि सलामीवीर म्हणून त्याने जी भूमिका बजावली, यावरून रोहित शर्माची अनुपस्थिती नक्कीच संघावर परिणाम करणारी असेल.

हेही वाचा – Rafael Nadal Retirement: लाल मातीवरील बादशाहचा टेनिसला अलविदा, अश्रूभरल्या डोळ्यांनी राफेल नदालने निवृत्तीची केली घोषणा

रोहित शर्माच्या जागी कोणाला मिळणार संधी?

रोहित शर्मा जर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका कसोटी सामन्यात खेळू शकला नाही, तर फॉर्मात असलेला फलंदाज अभिमन्यू इश्वरनला त्याच्या जागी भारतीय संघात संधी मिळू शकते. हिटमॅनच्या अनुपस्थितीत शुबमन गिल आणि केएल राहुलपैकी एकाला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे.

हेही वाचा – PAK vs ENG Test: इंग्लंडने भारताचा पाकिस्तानमधील २० वर्षे जुना विक्रम मोडला, कसोटी सामन्यात उभी केली विक्रमांची चळत

अभिमन्यू इश्वरन फॉर्मात तर आहेच पण याशिवाय तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये असेल, जो एका मालिकेत भारत अ संघाचे नेतृत्व करणार आहे. अभिमन्यू ईश्वरनने दुलीप ट्रॉफीमध्ये २ शतकं झळकावली आहेत आणि नुकत्याच झालेल्या इराणी चषक २०२४ च्या सामन्यातही त्याने १९१ धावांची शतकी खेळी खेळून खळबळ उडवून दिली.