Shikhar Dhawan on Rohit Sharma: भारतीय संघाचा फलंदाज शिखर धवन बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर आहे. गेल्या एक वर्षापासून निवड समितीने त्याला संघात संधी दिली नाही. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही धवनचा समावेश नव्हता. अशा परिस्थितीत तो संघात पुनरागमन करण्यासाठी खूप उत्सुक आहे. दरम्यान, शिखर धवनने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले आहे. जाणून घेऊया शिखर काय म्हणाला.

शिखर धवन म्हणाला, “जेव्हा मी आणि रोहित शर्मा दोघेही एकत्र सलामी करत होतो, तेव्हा दुसऱ्या टोकाला उभा असलेला रोहित दबाव कमी करत असे. आम्ही दोघे एकमेकांना समजून घेत होतो. रोहितबरोबर सलामीला फलंदाजी करणे नेहमीच आरामदायक होते. आम्ही मिळून ६००० हून अधिक धावा केल्या आहेत. रोहित आणि मी भारतीय क्रिकेटसाठी सर्वात यशस्वी सलामी भागीदारी बनवली आहे. त्यामुळे मी माझ्या अनेक सर्वोत्तम कामगिरीचे श्रेय रोहित शर्माच्या समर्थनाला देतो. त्यानं माझं करिअर बनवलं आहे.”

Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
shivraj singh chauhan Maha Vikas Aghadi and Rahul Gandhi mislead the public with false promises and no development vision
शिवराजसिंह चौहान म्हणतात राहुल गांधींकड विकासाचे कुठलेही व्हीजन नाही
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : “मोदी ४०० हून अधिक जागांची मागणी करत होते कारण..”, शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर अधिक प्रेम आणि..”, संजय राऊत काय म्हणाले?
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य

शिखर धवननेही धोनीच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आणि म्हणाला, “(एम.एस. धोनी) भाई मैदानावर खूप शांत स्वभावाचे आहेत. हा शांत स्वभावाचा दृष्टिकोन त्याच्या कर्णधारपदाचे वैशिष्ट्य आहे. धोनीभाईने घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांसाठी अनेकदा प्रशंसा केली जाते. विशेषत: दबावाच्या परिस्थितीत माही त्याच्या क्रिकेटच्या कौशल्यासाठी ओळखला जातो.”

हेही वाचा: T20 World Cup: पार्थिव पटेलचा मोठा दावा; म्हणाला, “जितेश शर्माचे टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणे…”

रोहित आणि त्याची सर्वोत्तम भागीदारीही आठवली

शिखर धवनने त्याच्या विधानात पुढे खुलासा केला की, त्याच्या आणि रोहितमधील कोणती भागीदारी त्याला सर्वात जास्त आवडते. तो यावर म्हणाला, “रोहित दुसऱ्या बाजूला आक्रमक खेळी करून समोरच्या फलंदाजाला दिलासा आणि आश्वासन देतो. मला वाटते की २०१९ मध्ये मोहाली येथे झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९३ धावांची सलामीची भागीदारी ही आमची सर्वोत्तम खेळी होती. दुबईतील २०१८ आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध दुसरी सर्वोत्तम भागीदारी होती जिथे आम्ही पहिल्या विकेटसाठी २१० धावांची भागीदारी केली होती.”

भारतीय संघात शिखर धवनचे मोलाचे योगदान आहे

३८ वर्षीय शिखर धवनने भारतासाठी आतापर्यंत एकूण ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय आणि ६८ टी-२० सामने खेळले आहेत. धवनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २३१५, एकदिवसीयमध्ये ६७९३ आणि टी-२० मध्ये १७५९ धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत ७ शतके आणि ५ अर्धशतके, वन डेमध्ये १७ शतके आणि ३९ अर्धशतके आणि टी-२० मध्ये ११ अर्धशतके केली आहेत.

हेही वाचा: Australian Open: सुमित नांगलची ऐतिहासिक कामगिरी! १९८९ नंतर ग्रँड स्लॅम स्पर्धेत अग्रमानांकित खेळाडूला पराभूत करणारा पहिला भारतीय

एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०१३ ते २०२२ पर्यंत शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी भारतासाठी डावाची सुरुवात करताना ५१४८ धावा केल्या आहेत. आता संघाबाहेर असलेल्या शिखर धवनने त्याचा साथीदार आणि कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले आहे.