IND vs AUS 5th Test Gautam Gambhir Press Conference Updates: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघ १-२ ने पिछाडीवर आहे. सिडनीमध्ये मालिका बरोबरीत करण्याची अखेरची संधी भारतीय संघाला आहे. भारतीय संघाच्या खराब कामगिरीसाठी चाहते आणि दिग्गजांनीही कर्णधार रोहित शर्माला जबाबदार धरले आहे. गेल्या काही काळापासून रोहित शर्माचा फॉर्म फारच खराब राहिला आहे तर त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताने मागील ४ कसोटी सामने गमावले आहेत. यानंतर आता रोहित शर्माने निवृत्ती घ्यावी असं चाहत्यांचं म्हणणं आहे. यादरम्यान आता भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी गुरुवारी पत्रकारांना रोहितबाबत दिलेलं उत्तर चकित करणार आहे.

पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीर पत्रकार परिषदेसाठी पोहोचले होते. याआधी रोहित शर्मा बहुतेक वेळा पत्रकार परिषदांमध्ये दिसला होता. सिडनी कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्माच्या स्थानाबद्दल गंभीरला विचारण्यात आले. रोहित शर्मा सिडनी कसोटी खेळणार का, असा प्रश्न त्यांना पत्रकार परिषदेदरम्यान विचारण्यात आला.

IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Jos Buttler Statement on Harshit Rana Concussion Substitute Controversy IND vs ENG
IND vs ENG: “आम्ही सामना जिंकणं अपेक्षित…”, जोस बटलरचं हर्षित राणाच्या खेळण्याबाबत मोठं वक्तव्य, सामन्यानंतर राणा-दुबेबाबत पाहा काय म्हणाला?
SL vs AUS Josh Inglis scores century on debut test match in front of parents breaks many records at Galle
SL vs AUS : जोश इग्लिसचे कसोटी पदार्पणात विक्रमी शतक! मोडले अनेक विक्रम
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
Rohit Sharma complains to BCCI about Sunil Gavaskar after blames his criticism BGT in Australia
Rohit Sharma : रोहित शर्माने बीसीसीआयकडे केली सुनील गावस्करांची तक्रार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
IND vs ENG Harry Brook Clean Bowled on Varun Chakravarthy in 2nd T20I Despite no Smog
IND vs ENG: “बघ धुकं आहे का?”, हॅरी ब्रुक वरूणच्या गोलंदाजीवर पुन्हा क्लीन बोल्ड, विकेट पाहून झाला चकित; VIDEO व्हायरल

हेही वाचा – IND vs AUS: “…त्या क्षणीच आम्ही सामना गमावला”, रोहित शर्माने सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण; सामन्यानंतर मोठं वक्तव्य

या प्रश्नाच्या उत्तरात गौतम गंभीरने जे सांगितले त्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. गंभीर म्हणाला, ‘खेळपट्टी पाहून आम्ही उद्या (३ जानेवारी) प्लेइंग इलेव्हन ठरवू.’ या उत्तराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे कारण खेळपट्टीनुसार कर्णधाराची निवड केली जात नाही. कर्णधार असतानाही रोहित शर्माच्या खेळण्याबाबत संभ्रम असेल, तर त्याला वगळले जाऊ शकते, अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे. शेवटच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल निश्चित मानले जात आहेत.

हेही वाचा – IND vs AUS: रोहित-विराट कसोटीतून निवृत्ती घेणार? रवी शास्त्रींनी दिले महत्त्वाचे अपडेट, भारतीय कर्णधाराबाबत मोठं वक्तव्य

रोहित शर्मा कर्णधार आहे आणि, संघात कर्णधाराचे स्थान आधीच निश्चित केले जाते. आता अशा स्थितीत संघाचे मुख्य प्रशिक्षक पत्रकार परिषदेत येऊन रोहित शर्माच्या खेळण्याबाबतचा निर्णयही नाणेफेकीच्या वेळीच घेतला जाईल, असे सांगत आहेत, तर मग रोहित शर्मा पाचवी कसोटी खेळणार की नाही याबाबत मोठा संभ्रम आहे. रोहित शर्माची कसोटीतील कामगिरी पाहून त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हेही वाचा – Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहच्या कामगिरीची ICCने घेतली दखल, एक नव्हे तर दोन मोठ्या पुरस्कारांसाठी केलं नामांकित

ऑस्ट्रेलियात रोहितने आतापर्यंत पाच डावात केवळ ३१ धावा केल्या आहेत. याशिवाय घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत त्याने सहा डावांत आणि बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर फक्त ९१ धावा केल्या आणि बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेत केवळ ४२ धावा केल्या होत्या. रोहितने १५ डावात केवळ १६४ धावा केल्या आहेत, ज्याची सरासरी ११ पेक्षा कमी आहे. कर्णधार म्हणून त्याची सरासरी ३०.५८ आहे, परंतु त्यापूर्वी त्याने ४६.८७ च्या सरासरीने धावा केल्या होत्या. २०२४ त्याला नावाप्रमाणे कामगिरी करता आली नाही.

Story img Loader