Rohit Sharma will Play in Sydney Test Or Not?: रोहित शर्मा सिडनी कसोटी खेळणार की नाही, हा यक्षप्रश्न सर्वच चाहत्यांना भेडसावत आहे. सिडनी कसोटीपूर्वीच रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडणार असल्याचे संकेत मिळत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. खुद्द मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रोहित शर्मा सिडनी कसोटी खेळण्यावर संभ्रम व्यक्त केला आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर अजून काही सोशल मीडिया पोस्टवरून चर्चांना उधाण आलं आहे.

सराव सत्र आणि स्लिप सराव

Rohit Sharma Viral Video of BCCI Awards on Smriti mandhana Question
VIDEO: “माझी बायको बघत असेल…”, विसरभोळ्या रोहित शर्माचं स्मृती मानधनाच्या प्रश्नावर भलतंच उत्तर; नेमकं काय घडलं?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
Rohit Sharma complains to BCCI about Sunil Gavaskar after blames his criticism BGT in Australia
Rohit Sharma : रोहित शर्माने बीसीसीआयकडे केली सुनील गावस्करांची तक्रार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”
Virat Kohli net practice with Sanjay Bangar video viral ahead Ranji Trophy match
Virat Kohli Net Practice : विराट कोहलीने रणजी ट्रॉफीमध्ये परतण्यापूर्वी गाळला घाम, नेटमध्ये सराव करतानाचा VIDEO होतोय व्हायरल
Nicholas Pooran withdraws Tom Curran run out appeal after a bizarre incident in ILT20 Video viral
Tom Curran run out : ILT20 मध्ये अजब नाट्य! रन आऊट झाल्यानंतरही टॉम करनला परत बोलावले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Manoj Tiwary says Gautam Gambhir and I would have had a fight that day
Gautam Gambhir : ‘…अन्यथा आमच्यात हाणामारी झाली असती’, गौतम गंभीरबरोबरच्या वादावर मनोज तिवारीचा मोठा खुलासा

सिडनीत होणाऱ्या पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया जोरदार सराव करत आहे. आज टीम इंडियाच्या सराव सत्राचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. यादरम्यान भारतीय खेळाडू स्लिप कॅचिंगचा सराव करतानाचा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. विराट कोहली, नितीश रेड्डी, केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल स्लिपमध्ये झेल घेण्याचा सराव करताना दिसले. यादरम्यान रोहित शर्मा दिसला नाही. रोहित नेहमी सामन्यात स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतो.

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्माला सिडनी कसोटीतून वगळणार? कोच गंभीरच्या उत्तराने सर्वांनाच बसला धक्का; कर्णधाराच्या खेळण्याबाबत संभ्रम

बुमराह, गंभीर आणि रोहितमध्ये चर्चा

याशिवाय रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि गौतम गंभीर खेळपट्टीची पाहणी करत असताना चर्चा करताना दिसले. यानंतर स्टेडियममध्ये बसूनही हे तिघे फार वेळ चर्चा करत होते. असे अनेक फोटो, व्हीडिओ चाहत्यांनी शेअर केले आहेत. यासर्व चर्चांवरूनच रोहित शर्मा आता सिडनी कसोटीत खेळणार की नाही, याबाबत अधिकृत माहितीच्या प्रतिक्षेत चाहते आहेत. कारण सिडनी कसोटीपूर्वीच रोहित शर्मा खेळणार की नाही याची माहिती समोर येईल.

हेही वाचा – IND vs AUS: सिडनी कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू झाला संघाबाहेर; गौतम गंभीरने दिली माहिती

बुमराह, गिल आणि गंभीरचा व्हीडिओ

सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील या व्हिडिओमध्ये सर्व खेळाडू सराव करत आहेत आणि त्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर युवा फलंदाज शुभमन गिलशी बोलतो आणि त्याच्या पाठीवर थाप मारतो. यानंतर जसप्रीत बुमराह गिलशी हात मिळवतो. या संपूर्ण दृश्यात रोहित शर्मा कुठेच दिसला नाही. आता संघाचा कर्णधार बदलला असून जसप्रीत बुमराहच्या हाती कमान आली आहे, असं चाहते म्हणत आहेत.

रोहित शर्मा सिडनी कसोटी खेळणं कठीण असेल याचे अनेक संकेत मिळत आहेत. या व्हिडिओशिवाय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्लेईंग इलेव्हन कशी असेल हेही सांगितले नाही. सर्वप्रथम रोहित शर्मा सिडनी कसोटीपूर्वी पत्रकार परिषदेला आला नव्हता. याशिवाय रोहित शर्मा सिडनी कसोटी खेळणार कि नाही हेदेखील सांगितलेलं नाही.

हेही वाचा – IND vs AUS: “खेळाडू आणि कोचमधील वाद…”, कोच गंभीरचं सिडनी कसोटीपूर्वी समोर आलेल्या ड्रेसिंग रूममधील वादावर मोठं वक्तव्य

सध्या भारत वि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका २-१ अशा वळणावर आहे. ऑस्ट्रेलिया २ सामने जिंकून या मालिकेत पुढे आहे. आता सिडनी कसोटी जिंकत भारताला मालिकेत बरोबरी सुधारण्याची संधी आहे, भारताने सिडनी कसोटी जिंकल्यास मालिका २-२ अशी बरोबरीत राहिल आणि अशारितीने भारतीय संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकेल.

Story img Loader