Rohit Sharma Names 3 Pillars of Team India: भारतीय क्रिकेट संघाने २९ जून २०२४ रोजी टी-२० विश्वचषक जिंकला. या ऐतिहासिक विजयात कर्णधार रोहित शर्माची भूमिका महत्त्वाची होती. रोहित शर्माने संपूर्ण विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. तर संपूर्ण संघानेही वेळोवेळी योगदान देत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. रोहित शर्माने आता भारताच्या विश्वचषक विजयाचे श्रेय तीन दिग्गजांना दिले आहे. रोहित शर्माने बुधवारी झालेल्या पुरस्कार सोहळ्याच ‘तीन दिग्गजांचं विशेष कौतुक केलं, ज्यांना त्याने जूनमध्ये टी-२० विश्वचषक २०२४ जिंकण्यात टीम इंडियाच्या यशामागील कारण म्हटले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Video : रोहित शर्माला पाहताच उभा राहिला श्रेयस अय्यर! खुर्चीवरून उठला अन् केलं असं काही…; ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक

भारताने टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आणि अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. २००७ नंतरचे भारताने २०२४ मध्ये दुसरा टी-२० विश्वचषक आपल्या नावे केला. रोहितने बार्बाडोसमधील त्या विजयासह टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली. सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्समध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवड झाल्यानंतर रोहित म्हणाला, हे माझं स्वप्न होतं की आकडे आणि परिणामांची चिंता न करता हा एक असा संघ निर्माण करू आणि असं वातावरण तयार करू की जिथे लोक जास्त विचार न करता मनमोकळेपणाने खेळू शकतील. हेच आवश्यक होते.

हेही वाचा – ICC Test Rankings: ICC ने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारताच्या खेळाडूंचा दबदबा, अश्विन-जडेजा पहिल्या स्थानी तर रोहित-विराट…

कोण आहेत भारतीय संघाचे ३ आधारस्तंभ? रोहित शर्मा म्हणाला…

रोहित पुढे म्हणाला की, मला माझ्या तीन आधारस्तंभांकडून खूप मदत मिळाली, जे खरं तर जय शाह, राहुल द्रविड आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आहेत. जागतिक स्पर्धांतील भारताचा दशकभराचा दुष्काळ संपवणारा विश्वचषक जिंकल्याची भावना शब्दात व्यक्त करता येणार नाही, असे रोहित म्हणाला. तो विश्वचषक जिंकल्यानंतर जी भावना होती, ती काही वेगळीच होती. आम्काही अशी एक गोष्ट मिळवली होती, ज्याची आम्ही खरोखर आतुरतेने वाट पाहत होतो. जेव्हा आम्ही विश्वचषक जिंकला, तेव्हा त्या क्षणाचा आनंद घेणे आम्हा सर्वांसाठी महत्त्वाचे होते, जे आम्ही खूप चांगलं केलं आणि आमच्यासोबत आनंद साजरा केल्याबद्दल संपूर्ण देशाचेही आभार

रोहित म्हणाला, “आमच्यासाठी जेवढा या विजेतेपद महत्त्वाचे होते, तेवढाच संपूर्ण देशाच्या मनातही तीच भावना होती. ती ट्रॉफी भारतात परत आणून इथे सगळ्यांसोबत सेलिब्रेट करताना खूप छान वाटलं. मला वाटत नाही की ही भावना व्यक्त करता येईल.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma names 3 pillars of team india rahul dravid jay shah and ajit agarkar and gives credit of t20 world cup 2024 win bdg