ICC Cricket World Cup, India vs Afghanistan: विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शानदार विजयानंतर, टीम इंडिया ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर त्यांच्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानशी भिडणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आगामी या सामन्यात दोन मोठे विक्रम करू शकतो. ज्यामध्ये ख्रिस गेलच्या विक्रमाचाही समावेश आहे.

रोहित शर्मा ख्रिस गेलला टाकू शकतो मागे –

रोहित शर्मा वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. रोहितच्या नावावर सध्या ५५१ षटकार आहेत आणि ५५३ षटकारांचा विक्रम असलेल्या ख्रिस गेलपासून तो फक्त २ षटकार दूर आहे. रोहितने तीन षटकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वात मोठा षटकार किंग ठरेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज –

ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – ५५३ षटकार
रोहित शर्मा (भारत) – ५५१ षटकार*
शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) – ४७६ षटकार
ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड) – ३९८ षटकार
मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड) – ३८३ षटकार

डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी –

एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद १००० करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाची बरोबरी करण्याचीही भारतीय कर्णधाराला संधी आहे. रोहितने १८ डावात ९७६ धावा केल्या आहेत आणि गेल्या आठवड्यात १९ डावात हा टप्पा गाठणाऱ्या डेव्हिड वॉर्नरची बरोबरी करण्यासाठी त्याला या सामन्यात फक्त २४ धावांची गरज आहे.

हेही वाचा – World Cup 2023, PAK vs SL: श्रीलंकेविरुद्धचा विजय गाझामधील बंधू-भगिनींसाठी! मोहम्मद रिझवान

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.