Rohit Sharma Sixth will become the Indian players: रविवारी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात इतिहास रचण्याकडे कर्णधार रोहित शर्माच्या नजरा असतील. रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. रोहित शर्माने रविवारी ७८ धावा केल्या, तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारा सहावा भारतीय खेळाडू ठरेल. रोहित शर्मापूर्वी हे स्थान सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, धोनी आणि विराट कोहली यांनी गाठले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रोहित शर्माची वनडे क्रिकेटमधील कारकीर्द २००८ मध्ये सुरू झाली. पण ६ वर्षे रोहित शर्माला संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. रोहित शर्माला २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळाली. यानंतर रोहित शर्माने मागे वळून पाहिले नाही आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये अधिक उंची गाठली.

रोहित शर्माने आतापर्यंत २४६ एकदिवसीय सामने खेळले असून ४८.८८ च्या उत्कृष्ट सरासरीने ९९२२ धावा केल्या आहेत. या काळात रोहित शर्माचा स्ट्राईक रेट ९०.०९ राहिला आहे. रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३० शतके आणि ४९ अर्धशतके केली आहेत. एवढेच नाही तर रोहित शर्मा हा जगातील एकमेव फलंदाज आहे, ज्याने वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावली आहेत. रोहित शर्माची वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या २६४ धावा आहे.

हेही वाचा – Asia Cup 2023: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! वनडे क्रमवारीत ‘या’ संघाने हिरावला नंबर वनचा मुकुट

सलामीला फलंदाजी करताना सर्वाधिक धावा रोहित शर्माच्या बॅटमधून आल्या आहेत. सलामीवीर म्हणून रोहित शर्माने १५८ डावांत सुमारे ५६ च्या सरासरीने ७८९२ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने ओपनिंग करताना ३० पैकी २८ शतके झळकावली आहेत. रोहित शर्माच्या बॅटने ओपनिंग करताना ३६ अर्धशतकेही झळकावली आहेत. नेपाळविरुद्ध अर्धशतक झळकावून रोहित शर्माने फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. अशा परिस्थितीत रविवारी रोहित शर्मा टीम इंडियाला शानदार सुरुवातच करेल असे नाही तर एकदिवसीय क्रिकेटमधील हा मोठा टप्पा गाठण्यातही तो यशस्वी होईल, अशी अपेक्षा केली जाऊ शकते.