Vikram Rathour says Rohit Sharma never forgets gameplans : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा संघातील सर्वात विसरभोळा खेळाडू असल्याचे म्हटले जाते. तो अनेक वेळा हॉटेल, विमान आणि इतर ठिकाणी आपले सामान विसरला आहे. इतकंच काय तो लग्नाची अंगठीसुद्धा एकदा विसरला होता, पण ती नंतर सापडली. स्वतः रोहित आणि त्याची पत्नी रितिकाने या सवयीबद्दल मुलाखतींमध्ये अनेकदा सांगितले आहे. आता टीम इंडियाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी नवा खुलासा केला आहे.

तो एक अतिशय चाणाक्ष रणनीतिकार –

आता विक्रम राठोड यांनी माजी क्रिकेटपटू तरुवर कोहलीच्या पॉडकास्टमध्ये कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले. राठोड म्हणाले, “मी कधीही कोणत्याही कर्णधाराला संघाच्या मीटिंगमध्ये किंवा रणनीतीमध्ये इतके सहभागी होताना पाहिले नाही, जितका रोहित शर्मा होतो. रोहित टॉसनंतर फलंदाजी किंवा गोलंदाजी निवडायची विसरत असेल, तसेच फोन आणि आयपॅड टीम बसमध्ये विसरुन येत असेल, परंतु तो त्याचा गेमप्लॅन कधीच विसरत नाही. तो त्या बाबतीत खूप हुशार आहे. तसेच तो एक अतिशय चाणाक्ष रणनीतिकार आहे.”

Sunil Gavaskar Statement on Virat Kohli And Rohit Sharma For Not Playing Duleep Trophy
Sunil Gavaskar: “जेव्हा तिशी पार केलेला खेळाडू…”, विराट-रोहितच्या दुलीप ट्रॉफी न खेळण्यावर सुनील गावसकर संतापले, BCCI ला पण सुनावलं
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Sai Tamhankar News
Sai Tamhankar : सई ताम्हणकर आणि अनिश जोग यांचं ब्रेक अप? ‘या’ स्टेटसमुळे रंगली चर्चा
Shreyas Iyer Helps Poor Woman with Money Video Viral
Shreyas Iyer: “एक मिनिट थांबाल…”, श्रेयस अय्यर दिसताच पैसे मागू लागली गरीब महिला, कारमध्ये बसला अन्… VIDEO व्हायरल
Rajiv Kumar on Maharashtra Assembly Election Date Schedule in Marathi
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…
Devendra Fadnavis On Ramdas Kadam
Devendra Fadnavis : महायुतीत धुसफूस? “मग आम्हालाही ५० गोष्टी बोलता येतात”, देवेंद्र फडणवीसांचा शिंदे गटाच्या नेत्याला इशारा
Atal Setu Viral Video
Atal Setu Viral Video : अटल सेतूवर थरार; रेलिंगच्या पलिकडे उतरलेल्या महिलेला पोलिसांनी वाचवलं, जबानीत म्हणाली, “मी तर…”
Devendra Fadnavis On Manoj Jarange
Devendra Fadnavis : “…तर मी राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

तो खेळाडूंसोबत बराच वेळ घालवतो –

माजी फलंदाजी प्रशिक्षक पुढे म्हणाले, “तो संघाच्या रणनीतीवर बराच वेळ घालवतो. तो गोलंदाजांच्या मीटिंगचा आणि फलंदाजांच्या मीटिंगचा भाग असतो. त्याला गोलंदाज आणि फलंदाजांसोबत बसून ते काय विचार करत आहेत, हे समजून घ्यायचे असते. तो खेळाडूंसोबत बराच वेळ घालवतो.” रोहितचे खेळाडूंचा कर्णधार म्हणून वर्णन करताना राठोड म्हणाले की, असाधारण क्षमता आणि स्थिरता असलेला फलंदाज असल्याने, रोहित इतर संघासाठी एक उदाहरण आहे.

हेही वाचा – MI किंवा CSK नव्हे…KKRने IPL 2025 पूर्वी रिलीझ केल्यास रिंकू सिंग ‘या’ संघाकडून खेळण्यास उत्सुक, स्वत:च केला खुलासा

संघासाठी नेहमीच एक आदर्श उदाहरण सेट केले –

विक्रम राठोड म्हणाले, “त्याचा पहिला गुण म्हणजे एक फलंदाज म्हणून तो एक उत्तम खेळाडू आहे. मला वाटते की तो असा आहे की ज्याला त्याचा खेळ खरोखर चांगला समजतो. त्याच्याकडे नेहमीच एक स्पष्ट गेम प्लॅन असतो. एक नेता म्हणूनही तुम्हाला आदर्श ठेवण्यासाठी अशी कामगिरी करावी लागते. विशेष म्हणजे जेव्हापासून तो कर्णधार झाला तेव्हापासून त्याने नेहमीच आदर्श ठेवला आहे.”

हेही वाचा – Jasprit Bumrah : ‘कर्णधारपदासाठी गोलंदाजच योग्य कारण ते स्मार्ट…’, जस्सीची खदखद व्यक्त; म्हणाला, ‘आम्ही बॅट मागे लपत नाही…’

टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये रोहितने सर्वांना चकित केले –

विक्रम राठोड पुढे म्हणाले की, “रोहितचे मैदानावरील निर्णय मात्र बहुतांश ‘स्पॉट ऑन’ राहिले आहेत. त्यांच्यापैकी काही निर्णय तुम्हाला डगआउट किंवा पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या प्रशिक्षकाप्रमाणेच आश्चर्यचकित करतात. यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला कळते की तो ‘मास्टर स्ट्रोक’ होता.” टी-२० विश्वचषकाचे उदाहरण देताना राठोड म्हणाले, “फायनलमध्ये त्याने जसप्रीत बुमराहची षटकं लवकर संपवली होती. ज्यामुळे अनेकांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असेल, पण या निर्णयामुळे आम्हाला अशा स्थितीत आणले, जिथे शेवटच्या षटकात १६ धावांचा बचाव करायचा होता. जो भारतीय संघाने यशस्वीपणे करुन दाखवला.”