Gautam Gambhir vs Virat Kohli: टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे कौतुक करत त्याला निःस्वार्थी लीडर म्हटले आहे. रोहित फलंदाजीच्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताने आतापर्यंत पाचही सामने जिंकले आहेत. रविवारी भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान, गंभीरने रोहितच्या आतापर्यंतच्या स्पर्धेत निस्वार्थ फलंदाजीचे कौतुक केले. गौतम गंभीरने रोहित शर्माच्या कौतुकाच्या वेळी जे शब्द निवडले होते त्यामुळे मात्र हे रोहितचं कौतुक कमी आणि विराट कोहलीला टोमणे जास्त आहेत असा अंदाज कोहलीच्या चाहत्यांनी व्यक्त केला आहे. असं नेमकं गंभीर म्हणाला तरी काय हे पाहूया..

गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हटले की, “रोहित शर्मा क्रांतिकारी आहे कारण तो निस्वार्थी आहे. संघाला त्याची ज्या रूपात गरज असते ती गरज तो आधी पूर्ण करतो. तुमच्या संघाने चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतः ते करून त्यांच्यासमोर एक आदर्श ठेवावा. आघाडीवर राहून नेतृत्व करण्यासाठी पीआर किंवा मार्केटिंग तुम्हाला मदत करणार नाही, तुम्हाला ते स्वतः करावे लागेल. विश्वचषकात रोहित याच पद्धतीने काम करत आहे, कदाचित त्याच्या धावांचे आकडे फार मोठे नसतील, पण सर्वाधिक धावा करण्यात तो १०व्या किंवा पाचव्या स्थानावर असेल, पण काही फरक पडत नाही, सर्वात महत्त्वाचं आहे संघाने विश्वचषक जिंकणं. १९ डिसेंबरला मिळणारी ट्रॉफी अधिक महत्त्वाची आहे.”

Duleep Trophy 2024 Rishabh Pant joins Shubman Gill lead A team
ऋषभने आपल्या कृतीने जिंकली पुन्हा चाहत्यांची मनं, विरोधी संघाची रणनीती जाणून घेण्यासाठी केलं असं काही की…
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल
Sanjay Manjrekar brually trolled by fans
Duleep Trophy 2024 : रोहित-विराट, बुमराहच्या विश्रांतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या माजी खेळाडूला चाहत्यांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…
Bhayandar, Shiv Sena Thackeray group, Clash Between Two Women Leaders, fight, viral video,
Video: भाईंदरमध्ये ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी
Manu Bhaker Statement on Bond with Coach Jaspal Rana
Manu Bhaker: ‘ते कदाचित माझ्या कानशिलात लगावतील…’, मनू भाकेर कोच जसपाल राणा यांच्याबद्दल असं का म्हणाली?
Thane, school football, national competition, Navi Mumbai, Vashi, Manipulation in School Football Tournaments, Nagaland, Manipur, age fraud, fake Aadhaar cards,
फुटबॉल स्पर्धा जिंकण्यासाठी नियमबाह्यरित्या खेळाडूंचा सहभाग, नवी मुंबईतील पालकांचा आरोप
analysis of world politics play for olympic games
ऑलिम्पिक खेळांच्या मैदानात राजकारणाचा ‘खेळ’

गंभीर पुढे म्हणाला की, “शतक ठोकणे किंवा विश्वचषक जिंकणे यापैकी तुमचे ध्येय काय आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. शतक झळकावायचे असेल तर त्यानुसार खेळा पण रोहित शर्मा निस्वार्थी कर्णधार आहे. त्याने ज्या प्रकारची फलंदाजी केली आहे, मला आशा आहे की तो उर्वरित टूर्नामेंटमध्येही अशीच कामगिरी करत राहील. रोहित शर्माने आरामात 40-45 शतके ठोकली असती पण त्याला आकडेवारीचे वेड नाही. एक चांगलं नेतृत्व करणारा नेता असाच असतो.”

हे ही वाचा<< “मला फरक पडत नाही, मी कोणाचं..”, रोहित शर्माचा ‘हा’ फंडा अन् के.एल राहुलला मिळालं बळ; शेअर केला अनुभव

विराट कोहलीच्या चाहत्यांची टीका

विश्वचषकात विराट कोहलीच्या शतकी खेळींसाठी टीममधील खेळाडूंनी मॅचमध्ये स्ट्राईक न घेणे, यावरून सोशल मीडियावर झालेल्या चर्चांमध्ये गौतम गंभीरचे हे विधान सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मागील आयपीएलपासून विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद अधिक प्रकर्षाने सोशल मीडियावर पाहायला मिळत होता त्यामुळे गंभीरने कौतुकाच्या आडून कोहलीला टोलवले आहे असे आता नेटकरी म्हणत आहेत.