Rohit Sharma on Mohammed Shami Australia Return: ऑस्ट्रेलियाविरूद्ध दुसऱ्या कसोटी पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. मात्र, रोहितने काही चिंताजनक माहितीही दिली. रोहित शर्माने सांगितले की सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान त्याच्या गुडघ्याला सूज आली होती. यानंतर मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाला येऊ शकतो की नाही, यावर कर्णधाराने मोठं वक्तव्य केलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दुखापतीतून सावरल्यानंतर मोहम्मद शमीने नोव्हेंबरमध्ये बंगालकडून रणजी ट्रॉफी सामने खेळले होते. त्याने मध्य प्रदेशविरुद्ध ७ विकेट घेतल्या होत्या. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने ७ सामने खेळले आहेत आणि २७.३ षटकात ८ बळी घेतले आहेत. या कामगिरीनंतर मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल अशा बातम्या येत आहेत. पण याबाबत अद्याप ऑफिशियल घोषणा झालेली नाही. पण अशी आशा आहे की आणखी कोणतेही अडथळे नसल्यास, तो लवकरतच संघात सामील होईल.
मोहम्मद शमीबद्दल रोहित शर्मा म्हणाला, “सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत खेळताना त्याच्या गुडघ्याला सूज आली होती, त्यामुळे आम्ही त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहोत. या कारणामुळेच त्याच्या कसोटी सामना खेळण्याच्या तयारीत अडथळे येत आहेत. आम्हाला खूप सावधगिरी बाळगायची आहे. त्याला अशात ऑस्ट्रेलियात आम्ही आणू शकत नाही.”
रोहित शर्मा पुढे म्हणाला, “तो १०० टक्के ठिक आहे की नाही याची खात्री आम्हाला करून घ्यायची आहे कारण बराच काळ लोटला आहे. आम्हाला त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकायच नाही आणि इथे येऊन संघासाठी काम करण्यासाठीगी दबाव आणायचा नाही. त्याच्या फिटनेसवर सर्व तज्ज्ञ लक्ष ठेवून आहे, त्यांच्या अनुभवाच्या आधारे आम्ही निर्णय घेऊ. प्रत्येक सामन्यादरम्यान ते त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहेत. खेळानंतर आणि चार षटके टाकल्यानंतर आणि २० षटके उभे राहिल्यानंतर त्याची स्थिती कशी आहे हे पाहिलं जात. पण शमीने कधीही येऊन खेळण्यासाठी दरवाजे कायम उघडे आहेत.
पर्थमधील पहिली कसोटी २९५ धावांनी जिंकल्यानंतर भारताला ॲडलेड कसोटीत १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. गुलाबी चेंडू कसोटीत भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. यामुळे संघ WTC क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अशा स्थितीत भारताला आता अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी पुढील ३ कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवणं आवश्यक आहे.
ू