Rohit Sharma’s reaction to Team India for selected Aus: सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संघाची घोषणा केली. केएल राहुलकडे पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आली आहे. संघाच्या निवडीनंतर रोहित म्हणाला की, आम्हाला जेव्हा-जेव्हा संधी मिळते तेव्हा आम्ही प्रयत्न करतो आणि खेळाडूंना संधी देतो.

संघ निवडीनंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “आम्हाला जेव्हा-जेव्हा संधी मिळते, तेव्हा आम्ही खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करतो. बेंच स्ट्रेंथला काही सामने खेळण्यासाठी संधी मिळेल याची आम्हाला खात्री करायची आहे. आपण खूप प्रवास करत आहोत आणि वर्ल्ड कपमध्येही असंच काही घडणार आहे. आम्हाला काही खेळाडूंची चाचणी घेण्याची संधी आहे आणि बेंच स्ट्रेंथ तपासणे देखील महत्त्वाचे आहे.”

Rohit Sharma to miss first Test against Australia Jasprit Bumrah to captain in Perth Devdutt Padikkal will be added in Team
IND vs AUS: रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर, BCCIला दिली माहिती; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूला संघात स्थान मिळणार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
IND vs AUS Sourav Ganguly Says Rohit Sharma should be playing the Perth Test
IND vs AUS : ‘… तर रोहित पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही’, सौरव गांगुलीचे हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’

या मालिकेतून पहिल्या दोन सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. रोहित तिसऱ्या वनडेसाठी कर्णधार म्हणून भारतीय संघात सामील होणार आहे. याशिवाय स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचेही वनडे संघात पुनरागमन झाले आहे. रविचंद्रन अश्विनने आपला शेवटचा वनडे सामना जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळला होता.

हेही वाचा – चेतेश्वर पुजारावर घालण्यात आली बंदी! कर्णधार असण्याची मिळाली शिक्षा, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

जर अक्षर पटेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ठरवून दिलेल्या २८ सप्टेंबरच्या मुदतीपर्यंत फिट झाला नाही, तर अश्विनचा विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या आशिया चषकादरम्यान अक्षरला दुखापत झाली होती.मुख्य निवडकर्ता अजित आगरकर अक्षरबद्दल म्हणाले, “आम्हाला आशा आहे की अक्षर पटेल तिसऱ्या सामन्यासाठी तंदुरुस्त होईल. तिसऱ्या वनडेसाठी आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदरचाही समावेश आहे.”

पहिल्या दोन सामन्यासाठी भारतीय संघ –

लोकेश राहुल (कर्णधार/विकेटकीपर) शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, तिलक वर्मा, प्रसिध्द कृष्णा, रविंद्रन, रविंद्रन आणि वॉशिंग्टन सुंदर.

हेही वाचा – IND vs AUS: ‘…म्हणून विराट-रोहितला पहिल्या दोन सामन्यातून वगळले’; मुख्य निवडकर्ता अजित आगरकरचा खुलासा

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, हार्दिक पाड्या (उपकर्णधार), विराट कोहली, कुलदीप यादव, अक्षर पटेल (फिटनेसबद्दल शंका), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.