IND vs BAN 2nd Test Scorecard: भारत वि बांगलादेशमधील कानपूर कसोटीत पावसामुळे दोन दिवसांचा खेळ रद्द झाल्यानंतर चौथ्या दिवसाचा सामना वेळेत सुरू झाला. बांगलादेशने ३ बाद १०७ धावा केल्या होत्या, इथूनच पुढे सामन्याला सुरूवात झाली. आता लंच ब्रेकपर्यंत बांगलादेशने ६ बाद २०५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये बांगलादेशचा फलंदाज मोमिनुल हकने शतक झळकावले आहे. तर भारताच्या गोलंदाजांनी पहिल्या सत्रात ३ विकेट मिळवली. यापैकी रोहित शर्माने लिटन दासचा जो झेल टिपला त्याची जोरदार चर्चा होत आणि त्याच्या कॅचचा व्हीडिओ पण व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय कर्णधार रोहित शर्मा केवळ फलंदाजीने नाही तर सोमवारी त्याने आपल्या क्षेत्ररक्षणानेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीत रोहितने असा झेल टिपला जे पाहून सर्वच जण चकित झाले. रोहितने असा झेल यापूर्वी क्वचितच घेतला असेल. रोहितच्या या कॅचचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.

हेही वाचा – VIDEO: “टीम इंडियाचा गजनी कोण?”, रोहित शर्माचं खरं उत्तर, तर सूर्यकुमारची प्रतिक्रिया पाहून आवरणार नाही हसू…

रोहित शर्माने टिपला चकित करणारा झेल

कानपूर कसोटीत बांगलादेशचा संघ प्रथम फलंदाजीला आला. ५०व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर लिटन दास स्ट्राइकवर होता. तर मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. लिटन दासने खेळपट्टीवर पुढे जात जोरदार शॉट मारला. लिटनने मिड-ऑफवरून चेंडू सीमारेषेबाहेर पाठवण्याच्या हेतूने तो फटका खेळला. मिड ऑफच्या इथे क्षेत्ररक्षणासाठी असलेला रोहितही सावध होता. चेंडू येताच रोहितने एक हात वर हवेत झेप घेतली आणि डाव्या हाताने चेंडू टिपला.

हेही वाचा – Musheer Khan Video: फ्रॅक्चर अन् मानेला सर्व्हायकल कॉलर… मुशीर खान अपघातानंतर वडिलांबरोबरचा VIDEO शेअर करत म्हणाला…

रोहित शर्माने हवेत झेप घेत तो चेंडू टिपल्याने भारताला लिटन दासची महत्त्वाची विकेट मिळाली. लिटनने आल्यापासून जोरदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला तर बुमराहच्या गोलंदाजीवर चांगले शॉट्स खेळत तो टीम इंडियावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर रोहित शर्माने फिल्ड बदलली आणि पुढच्याच षटकात तो बादही झाला.

रोहित शर्माने हवेत झेपावत पकडलेली ती कॅच पाहून सगळेच अवाक् झाले. मैदानात असलेल्या शुबमन गिलने तर डोक्यावर हात ठेवून आश्चर्य व्यक्त केलं. रोहितने तो झेल टिपताच मैदानात धावू लागला तर सर्व खेळाडूही रोहितजवळ येत आश्चर्याने पाहत त्याचं कौतुक करत होते. लिटन दासही क्रिझवर उभं राहून चकित होत तो झेल पाहतच राहिला. याचबरोबर डगआऊटमध्ये बसलेले गौतम गंभीर, अभिषेक नायर रोहितचा झेल पाहून हसत होते आणि टाळ्या वाजवत कौतुकही केलं. रोहित शर्माच्या झेलवर खेळाडू आणि कोचच्या प्रतिक्रियेचा व्हीडिओही व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma one hand stunning catch of litton das left everyone shocked in ind vs ban 2nd test video viral bdg